एसटी संप सुरूच; ३४ आगारांतील वाहतूक विस्कळीतच

सोमवारीही राज्यातील २५० पैकी ३७ आगारातील वाहतूक बंद होती. कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, सातारा, गडचिरोली यासह अन्य काही आगारांचा यात समावेश आहे

३४ आगारांतील वाहतूक विस्कळीतच

मुंबई : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करा या मागणीसाठी राज्यातील काही आगारात गेल्या चार दिवसांपासून संप सुरुच आहे. संप मोडण्यासाठी एसटी महामंडळाने दिवाळीच्या मुहूर्तावर कामगारांचे दर महिन्याच्या ७ तारखेला होणारे वेतन यंदा १ नोव्हेंबरला दिले. त्याचबरोबर दिवाळी भेट म्हणून अडीच हजार रुपये आणि सुधारित महागाई भत्त्यासह घरभाडे भत्ताही  खात्यात जमा के ला.

ऐन दिवाळीत कामगारांचे आर्थिक प्रशद्ब्रा सुटल्यानंतर कामगार कामावर रुजू होतील, अशी आशा एसटी महामंडळाला आहे. त्यानंतरही संप कायम राहिल्यास कारवाईची टांगती तलवार कामगारांवर असणार आहे. विलीनीकरणासह अन्य काही मागण्यांवर दिवाळीनंतर चर्चा करण्याची तयारीही महामंडळाने दर्शवली असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.

सोमवारीही राज्यातील २५० पैकी ३७ आगारातील वाहतूक बंद होती. कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, सातारा, गडचिरोली यासह अन्य काही आगारांचा यात समावेश आहे. जवळपास ८५ टक्के  आगारातील एसटी वाहतूक सुरळीत सुरु असून १५ टक्के च वाहतूक विस्कळीत असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.

 कामावर रुजू न झाल्यास सोमवारपासून कामगारांना बडतर्फ करण्याची तयारी महामंडळाने सुरु के ली होती. परंतु सोमवारी दुपारी एसटी महामंडळाची बैठक झाली आणि आगारातील संप, विस्कळीत सेवा, कर्मचाऱ्यांचे वेतन व अन्य देणी यावर चर्चा झाली. अखेर १ नोव्हेंबरला वेतन व भत्ते वैगरे कामगारांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

एसटी कामगारांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कामगारांना कामावर रुजू होण्याचे पुन्हा आवाहन आम्ही

के ले आहे. त्याचबरोबरच त्यांचे वेतन, दिवाळी भेट, भत्तेही दिले आहेत. त्यांच्या अन्य काही मागण्यांवर दिवाळीनंतर चर्चेची तयारी ठेवली आहे. त्यामुळे प्रवाशांना वेठीस धरु नये असेही आवाहन के ले असून कारवाई तूर्तास बाजूला ठेवली आहे.  त्यानंतरही संप सुरुच राहिल्यास कारवाईशिवाय पर्याय नाही. -अनिल परब, परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 34 depots is disrupted st corporation in diwali festival akp

ताज्या बातम्या