अन्न व औषध प्रशसनाची कारवाई 

inquiry committee set up to investigate rto scam
परिवहन विभागातील घोटाळ्याच्या तपासासाठी चौकशी समिती स्थापन
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
cashew farmer marathi news, konkan farmer marathi news
काजू वायदे : कोकणातील उत्पादकांना वरदान
fruit sale cess evaders
फळे विक्री उपकर बुडवणाऱ्यांवर कारवाई, एपीएमसी प्रशासनाचा निर्णय; प्रामुख्याने आंब्याच्या जातीचा उल्लेख करणे अनिवार्य

मुंबई :  दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणाऱ्या आणि माहितीपत्रक, वेष्टने यावरही चुकीची माहिती देणाऱ्या ३४ औषधांचा साठा एका नामांकित कंपनीच्या औषध विक्री दुकानातून अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे. या दुकानावर औषधे जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायद्यांतर्गत कारवाई सुरू आहे.

भिवंडी येथील नामांकित कंपनीच्या औषधे विक्री दुकानात दिशाभूल करणारा मजकूर असलेली आयुर्वेदिक औषधे विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती गुप्तवार्ता विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागाने तपासणी केली असता आक्षेपार्ह मजकूर असलेली २० औषधे आढळली. याच कंपनीच्या दहिसर येथील औषध विक्री दुकानातही तेथेही आक्षेपार्ह मजकूर असलेली औषधे आढळली. ही औषधे सुमारे ६६ हजार रुपयांची असून ती जप्त करण्यात आली आहेत.

ही कारवाई सहआयुक्त (दक्षता) समाधान पवार, साहाय्यक आयुक्त गणेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्तावार्ता विभागाचे औषध निरीक्षक रवी, प्रशांत अस्वार, ठाण्याच्या औषध निरीक्षक पाष्टे, जोसेफ चिरमेल आणि मुंबईचे औषध निरीक्षक एड्लावर यांनी केली.  

‘सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत’

सर्वसामान्य जनतेने दिशाभूल करणारे दावे असलेली औषधे खरेदी करून कोणत्याही सल्ल्याशिवाय खाऊ नयेत. औषधे व सौंदर्य प्रसाधने यांच्या दर्जाबाबत कोणतीही तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या संबंधित जिल्हा कार्यालय तसेच टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५वर संपर्क करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जादूटोणादी उपाय कायद्यांतर्गत कारवाई

श्वसन विकार-अस्थमा, निद्राविकार, लैंगिक शक्तिवर्धक, महिलांच्या मासिक पाळी संबंधात आजार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब इत्यादी आजारांवर उपयुक्त असल्याचा व दिशाभूल करणारा मजकूर नमूद केला होता. त्यामुळे ही औषधे जादूटोणादी उपाय कायद्यांतर्गत विक्रेत्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.