मुंबई : वधू-वर सूचक संकेतस्थळावरून तरुणींची माहिती मिळवून लग्नाचे आमीष दाखवत अनेक तरुणींची आर्थिक फसवणूक करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला गुन्हे शाखेने सोमवारी कल्याणमधून अटक केली. त्याने मुंबई, नवी मुंबई, नाशिकसह महाराष्ट्राबाहेरील ३० ते ३५ मुलींची फसवणूक केल्याचा संशय आहे.

विशाल सुरेश चव्हाण ऊर्फ अनुराग चव्हाण (३४) असे आरोपीचे नाव असून तो कल्याण पूर्व येथील रहिवासी आहे. त्याने अभियांत्रिकी पदवी (बी.टेक.) आणि व्यवस्थापन शाखेतील पदव्युत्तर पदवीचे (एमबीए) शिक्षण घेतले आहे. आरोपीविरोधात कांजूरमार्ग, शीव, वर्सोवा, नारपोली येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात फसवणूक, विनयभंग व बलात्काराच्या गुन्ह्याचाही समावेश आहे. तरुणींना भावनिक जाळय़ात ओढून आरोपी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाने आर्थिक फसवणूक करायचा.

Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Founder and CEO of Cafe Mutual Prem Khatri
बाजारातली माणसं : फंड वितरकांचा हक्काचा माणूस- प्रेम खत्री
IIIT Nagpur job hiring news marathi
IIIT Nagpur Recruitment 2024 : नागपूरच्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये नोकरीची संधी! ‘या’ पदावर होणार भरती

कांजूरमार्ग येथे राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणीशी आरोपीने वधू-वर सूचक संस्थेच्या संकेतस्थळावरून संपर्क साधला साधला होता. आरोपीने या तरुणीला लग्नाचे आमीष दाखवून तिच्याकडून गुंतवणुकीच्या नावाखाली सव्वा दोन लाख रुपये घेतले होते. तरुणीने ही रक्कम त्याच्या बँक खात्यावर जमा केली. त्यानंतर या आरोपीने तरुणीशी संपर्क साधणे बंद केले.  तिने कांजूरमार्ग पोलिसांत फसवणुकीची तक्रार केली होती. याप्रकरणी समांतर तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माहिती घेतली असता आरोपीने समाजमाध्यमांवर खोटी छायाचित्रे, पत्ता दिला असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कल्याणमधील श्रद्धानगर येथील फ्लॅटमधून आरोपीला अटक केली. प्राथमिक तपासात आरोपीने ३० ते ३५ तरुणींना लग्नाचे आमीष दाखवून  १५  ते २० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. तसेच पुरुषांना आयफोन विकण्याच्या नावाखाली संपर्क साधून फसवल्याचे निष्पन्न झाले आहे