मुंबई : वधू-वर सूचक संकेतस्थळावरून तरुणींची माहिती मिळवून लग्नाचे आमीष दाखवत अनेक तरुणींची आर्थिक फसवणूक करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला गुन्हे शाखेने सोमवारी कल्याणमधून अटक केली. त्याने मुंबई, नवी मुंबई, नाशिकसह महाराष्ट्राबाहेरील ३० ते ३५ मुलींची फसवणूक केल्याचा संशय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशाल सुरेश चव्हाण ऊर्फ अनुराग चव्हाण (३४) असे आरोपीचे नाव असून तो कल्याण पूर्व येथील रहिवासी आहे. त्याने अभियांत्रिकी पदवी (बी.टेक.) आणि व्यवस्थापन शाखेतील पदव्युत्तर पदवीचे (एमबीए) शिक्षण घेतले आहे. आरोपीविरोधात कांजूरमार्ग, शीव, वर्सोवा, नारपोली येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात फसवणूक, विनयभंग व बलात्काराच्या गुन्ह्याचाही समावेश आहे. तरुणींना भावनिक जाळय़ात ओढून आरोपी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाने आर्थिक फसवणूक करायचा.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 34 year old arrested for cheating 30 to 35 women promising marriage zws
First published on: 19-01-2022 at 01:26 IST