मुंबई : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा आतापर्यंत ३५ लाख २६ हजार २६५ मतांनी लाभ घेतला आहे. गरोदरपणात आणि बाळंतपणात महिलांना आरोग्य सेवा-सुविधा आणि प्रोत्साहनाच्या माध्यमातून कुपोषणाचा प्रभाव कमी करणे आणि माता व बाल आरोग्य सुधारणे हा प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत पहिल्या अपत्यासाठी दोन हप्त्यांत ५ हजार रुपयांची मदत दिली जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिला हप्ता ३ हजार रुपयांचा असून त्यासाठी राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या शासकीय आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी आणि शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून ६ महिन्यांच्या आता किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी करणे आवश्यक आहे. दुसरा हप्ता २ हजार रुपये असून त्यासाठी बाळाची जन्म नोंदणी आणि बालकास बीसीजी, ओपीव्ही झीरो, ओपीव्ही ३ मात्र, पेन्टाव्हॅलेन्टलसीच्या ३ मात्रा अथवा पर्यायी लसीकरणाचे प्राथमिक चक्र पूर्ण करणे आवश्यक आहे. दुसरे अपत्य मुलगी असल्यास तिच्या जन्मानंतर एक रकमी ६ हजार रुपये मदत दिली जाते. त्यासाठी जन्मदाखला असणे आवश्यक असून बालकाचे पेन्टा ३ पर्यंतचे (१४ आठवडे) लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत २०१७ ते मार्च २०२४ कालावधीत ३५,२६,२६५ लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे.

हेही वाचा – मुंबईत पीएम २.५ च्या पातळीत वाढ

हेही वाचा – तळीये पुनर्वसनाचा दुसरा टप्पा जूनमध्ये पूर्ण

लाभार्थीची ऑनलाइन नोंदणी

केंद्र शासनाच्या १४ जुलै २०२२ रोजीच्या पत्रानुसार प्रधानमंत्री मातृवंदना योजना दोन ही नव्या स्वरूपात देशात लागू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये पूर्वी केवळ पहिल्या अपत्यासाठी लाभ मिळत असे, मात्र आता नवीन संकल्पनेनुसार १ एप्रिल २०२२ नंतर दुसरे अपत्य मुलगी जन्माला आल्यानंतरच्या लाभार्थीचा देखील या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. नवीन निकष पात्र लाभार्थी शोधून आशा किंवा अंगणवाडी सेविका त्यांच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थीची ऑनलाइन पीएमएमव्हीवाय सॉफ्टवेअरमध्ये लाभार्थी नोंदणी केली जाते.

या योजनेंतर्गत जानेवारी २०२४ ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यातील २,८२,२३९ लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून, सन २०२०-२१ मध्ये ५,४७,२१९, सन २०२१-२२ मध्ये ६,०९,९२१, सन २०२२-२३ मध्ये ५,२१,७५० आणि सन २०२३-२४ मध्ये १,१९,८२८ लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 35 lakh beneficiaries in pradhan mantri matruvandana yojana mumbai print news ssb