संप मोडण्याच्या हालचाली तीव्र; एसटीच्या ३६ बसचा प्रवास

एसटीत एकूण २८ कामगार संघटना आहेत. संपात केवळ दोनच संघटना आघाडीवर आहेत.

एसटीच्या ३६ बसचा प्रवास; दीड हजार संपकरी कामावर रुजू

मुंबई : प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई के ल्यानंतर आता एसटी महामंडळाने संप मोडण्यासाठी शुक्र वारी पोलीस संरक्षणात राज्यातील विविध आगारातून एसटी गाड्या बाहेर काढल्या. ३६ एसटीतून ८२६ प्रवाशांनी प्रवास के ल्याची माहिती महामंडळाने दिली.

काही कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार असून त्यांना पोलीस संरक्षण दिले जाईल, अशी ग्वाही महामंडळाने दिली होती. त्यानंतर शुक्र वारपर्यंत यांत्रिकी कर्मचाऱ्यांबरोबरच चालक-वाहकांसह अन्य विभागातील एकूण दीड हजार कर्मचारी पुन्हा रुजू झाल्याचा दावा महामंडळाने के ला आहे.  एसटीने गाड्या चालवल्या, त्याबरोबर काही आगारातून खासगी प्रवासी बस, वडापही सेवेत ठेवण्यात आल्या. शनिवारीही महामंडळाने आणखी काही गाड्या आगाराबाहेर काढण्याचे नियोजन के ले आहे. एसटीचे चालक-वाहक कर्तव्यावर येत नाहीत, तोपर्यंत महामंडळाने एसटी चालवण्यासाठी काही खासगी प्रवासी बस वाहतुकदारांकडून चालक घेण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र काहींनी चालक देण्यास नकार दिला, तर काहींनी तयारी दर्शविली आहे. त्यातच एसटीच्या भाडेतत्त्वावर शिवशाही देणाऱ्या पुरवठादारांकडूनही चालक घेण्याची प्रक्रि या सुरु के ल्याचे सूत्रांनी सांगितले. 

आणखी बैठका…

आतापर्यंत दोन हजार कर्मचारी कामावर आले असून यात बहुसंख्य यांत्रिकी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणात कर्मचारी संपर्क साधत आहेत. संपामुळे स्थानिक प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी संबंधित पालिकांच्या मदतीनेही बस सेवा सुरु करण्यात येत असल्याचे  एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी  सांगितले.  दरम्यान, निलंबनाच्या कारवाईनंतर शुक्र वारी काही कामगार संघटनांच्या बैठकाही झाल्या आणि कामगार कर्तव्यावर रुजू करुन घेण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.

संघटनांमध्ये चर्चा…

एसटीत एकूण २८ कामगार संघटना आहेत. संपात केवळ दोनच संघटना आघाडीवर आहेत. संपात सहभागी नसलेल्या, परंतु विलीनीकरणाच्या मागणीला पाठिंबा देणाऱ्या बड्या संघटना प्रत्यक्षात समोर आलेल्या नाहीत. निलंबनाच्या कारवाईमुळे एसटीतील काही संघटनांनी शुक्र वारी बैठक घेऊन संपाला पाठिंबा द्यावा की पुन्हा कामावर रुजू व्हावे याबाबत चर्चा के ल्याचे समजते.

एसटी महामंडळाने बस चालविण्यासाठी चालक मागितले होते. मात्र आमच्या संघटनेने नकार दिला. आमचा बस चालवण्याचा व्यवसाय आहे. चालक पुरवण्याचा नाही. त्यामुळे बस आणि चालक दोन्ही सेवा देऊ असे स्पष्ट के ले. हर्ष कोटक, सचिव, मुंबई बस मालक संघटना संपकऱ्यांविरोधात राज्यभरात ४७ गुन्हे दाखल

आगाराला टाळे लावणे, गाड्या अडविणे, कर्मचाऱ्यांना दमदाटी करणे आणि एसटी बसगाड्यांची तोडफोड करणे इत्यादी कारणांमुळे राज्यात २७ ऑक्टोबरपासून संपकऱ्यांविरोधात ४७ गुन्हे दाखल झाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. यात एसटीचे कर्मचारी असून राजकीय पक्षांचे काही कार्यकर्तेही आहेत. आतापर्यंत बसगाड्यांवर दगडफे कीच्या आठ घटना घडल्या असून पाच घटना गेल्या दोन दिवसांत घडल्या आहेत.

सुरू झालेल्या सेवा…

मुंबईतून पहिली एसटी बस दुपारी अडीच वाजता साताऱ्याच्या दिशेने रवाना झाली. यामध्ये पंधरा प्रवासी होते. तर स्वारगेटमधून ठाणे, कोल्हापूर, दादर, मिरजसाठी शिवनेरी आणि शिवशाही बस, तर पुणे स्थानक ते दादर, नाशिक ते पुणे, दादर ते पुणे, राजापूर ते बुरुंबेवाडी, अक्कलकोट ते सोलापूर, इस्लामपूर ते ते वाटेगाव, सांगली ते पुणे या मार्गावर एसटीच्या बसगाड्या धावल्या.

झाले काय?

महामंडळाने भाडेतत्त्वावरील शिवशाहीबरोबरच शिवनेरी आणि साध्या बस चालवण्यास शुक्रवारी सुरुवात के ली. भाडेतत्त्वावरील शिवशाही आणि शिवनेरी बसवर कं त्राटदारांचेच चालक , तर साध्या बसवर एसटीचे चालक व वाहक कार्यरत होते.

एसटी महामंडळाने बस चालविण्यासाठी चालक मागितले होते. मात्र आमच्या संघटनेने नकार दिला. आमचा बस चालवण्याचा व्यवसाय आहे. चालक पुरवण्याचा नाही. त्यामुळे बस आणि चालक दोन्ही सेवा देऊ असे स्पष्ट के ले.  – हर्ष कोटक, सचिव, मुंबई बस मालक संघटना

आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत कामगारांना भडकविण्याचा प्रयत्न करत आहेत.  कामगारांचे नुकसान झाल्यास ते जबाबदारी घेणार आहेत का. माझी एसटी कामगारांना विनंती आहे की कामावर रूजू व्हा, प्रशासनाला सहकार्य करा. जे कामगार कामावर येऊ इच्छितात त्यांना संरक्षण दिले जाईल.  – अनिल परब, परिवहन मंत्री व एसटी महामंडळ अध्यक्ष

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 36 st buses one and a half thousand contacts to work akp

ताज्या बातम्या