scorecardresearch

चुनाभट्टीत सहाय्यक पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

प्रकाश थेतले (वय ३८) असे या मृत्यू झालेल्या पोलीस अधिकऱ्याचे नाव असून ते नवीमुंबई येथील कोपरखैरणे पोलीस ठाण्यात कार्यरत हो

police

मुंबई : चुनाभट्टी पोलीस वसाहतीमध्ये नैराश्यातून एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने घरातच गळफास लावून रविवारी पाहाटे आत्महत्या केली. याबाबत चुनाभट्टी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.

प्रकाश थेतले (वय ३८) असे या मृत्यू झालेल्या पोलीस अधिकऱ्याचे नाव असून ते नवीमुंबई येथील कोपरखैरणे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. कौटुंबिक कारणामुळे ते तणावात होते. ते चुनाभट्टी येथील पोलीस वसाहतीमधील घरी रविवारी झोपले होते. त्यांची पत्नीही घरी होती. मात्र पहाटेच्या सुमारास दुसऱ्या खोलीत जाऊन त्यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. पत्नीला या प्रकाराची माहिती मिळताच तिने चुनाभट्टी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत, अपमृत्यूची नोंद केली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 03:41 IST
ताज्या बातम्या