मुंबई: चेंबूर परिसरात नाकाबंदी दरम्यान मंगळवारी सायंकाळी एका मोटारगाडीत पोलिसांना चाळीस लाखांची रोकड मिळाली. याप्रकरणी, टिळकनगर पोलिसांनी रोकड आणि मोटारगाडी चालकाला ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – जनशताब्दी, कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी ७६ हजारांवर

हेही वाचा – उद्या कोणी याचिका करून पद्म पुरस्काराची मागणी करेल, उच्च न्यायालयाचे हस्तक्षेप याचिका करणाऱ्यांना खडेबोल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी सुरू आहे. यानुसार, चेंबूरच्या पेस्टम सागर परिसरात पोलिसांकडून मंगळवारी नाकाबंदी सुरू होती. तेव्हा याठिकाणी एक मोटारगाडी आली. या गाडीबाबत पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तत्काळ गाडी बाजूला घेण्यास सांगितली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या गाडीची तपासणी केली असता, गाडीमध्ये पोलिसांना चाळीस लाख रुपयांची रक्कम आढळून आली आहे. या रक्कमेबाबत चालकाने योग्य माहिती न दिल्याने टिळकनगर पोलिसांनी रोकड आणि चालकाला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस आणि निवडणूक अधिकारी अधिक तपास करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 40 lakh cash found in chembur mumbai print news ssb