मुंबईः आईवरून चिडवल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने ४३ वर्षीय व्यक्तीची स्क्रू ड्रायव्हरने भोसकून हत्या केल्याची घटना कांदिवली पश्चिम येथे घडली. याप्रकरणी १७ वर्षीय मुलाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अब्दुल रहिम मलिक (४३) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते कांदिवली पश्चिम येथील इराणीवाडा रोड परिसरात राहत होते. हेही वाचा >>> मुंबईत १८ वर्षांच्या तरुणाची चार मित्रांनी चाकूचे वार करत केली हत्या, वाढदिवसाच्या पार्टीवरुन वाद झाल्याने घडली घटना मलिक यांनी १७ वर्षीय मुलाला त्याच्या आईवरून चिडवले. त्या रागातून आरोपी मुलाने मलिकच्या काखेत, उजव्या खांद्यावर व डोक्याच्या बाजूला स्क्रू डायव्हर भोसकला. त्यात गंभीर जखमी झालेल्या मलिकला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी करून मलिकला मृत घोषित केले. याप्रकरणी मलिकच्या मृत्यूनंतर पोलिसांनी त्याची आई मुमताज मलिक (७५) यांच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर मंगळवारी १७ वर्षीय मुलाला तो राहत असलेल्या परिसरातून ताब्यात घेऊनी त्याची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आली. याप्रकरणी कांदिवली पोलीस अधिक तपास करत आहेत.