मुंबईत दिवसभरात ४३४ रुग्ण

मुंबईत एकूण बाधितांचा आकडा दोन लाख  ९९ हजारापुढे गेला आहे

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईत  सोमवारी करोनाच्या ४३४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून  ९ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांच्या संख्येत घट होत असून सध्या ७३६४ रुग्ण उपचाराधीन आहेत.

मुंबईतील करोनाची स्थिती नियंत्रणात येत असून रुग्ण वाढीचा सरासरी दर ०.२१ टक्कय़ावर स्थिर आहे. तर रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी ३५९ दिवसांपर्यंत म्हणजे सुमारे एक वर्षांपर्यंत गेला आहे. दर दिवशी आढळणाऱ्या रुग्णांमध्ये  लक्षणेविरहित रुग्ण मोठय़ा संख्येने आढळू लागले आहेत.

मुंबईत एकूण बाधितांचा आकडा दोन लाख  ९९ हजारापुढे गेला आहे. सोमवारी एका दिवसात २३९ रुग्ण बरे होऊन घरी गेले.  आतापर्यंत दोन लाख ७९ हजाराहून अधिक म्हणजेच ९३ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत दररोज सरासरी १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यापैकी ५ टक्के  अहवाल होकारात्मक येत आहेत. सोमवारी ९४०० हजार चाचण्या करण्यात आल्या व त्यापैकी ५ टक्के अहवाल होकारात्मक आले.  एकूण चाचण्यांपैकी बाधित रुग्णांचे प्रमाण १२ टक्कय़ांच्याही खाली गेले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 434 patients in mumbai in a day abn