मुंबईः मुदत ठेवींवर चांगला परतावा देण्याचे आमीष दाखवून ४५ गुंतवणुकदारांची १६ कोटी ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण कायद्याअंतर्गत वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) येथील कंपनीशी संबंधित १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

आरोपी कंपनीने सुरुवातीला गुंतवणुकदारांना चांगला परतावा दिला, पण त्यानंतर पैसे मिळणे बंद झाले. त्यामुळे गुंतवणुकदारांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. पेडर रोड येथील रहिवासी असलेले तक्रारदार रामचंद्र नागपाल (७१) वित्त सल्लागार म्हणून काम करतात. यांच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने कंपनीचे संचालक व इतर पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यात आनंद सरनाईक, दिव्यानी सरनाईक, अलोक शर्मा, ब्रायन सॅण्डरसन, मोहन कौल, आर. एस. पी सिन्हा, समर रे, शंतनू रोज, निधी मेहता, गिरीश शाहू, जॅक्सन वाझ व अमित जस्ते यांचा समावेश आहे.

bombay high court nitesh rane speech examine
मीरा-भाईंदर हिंसाचार प्रकरण : नितेश राणेंसह दोन भाजपा नेत्यांची भाषणं तपासण्याचे कोर्टाचे आदेश
prashant bhushan
चार हजार कोटींच्या निवडणूक रोख्यांचा हिशेब नाही! प्रशांत भूषण यांचा दावा; एसआयटी चौकशीसाठी लवकरच याचिका
Recovery of 605 crores for house rent action of Zopu authority is shock to developers
घरभाड्यापोटी ६०५ कोटींची वसुली, ‘झोपु’ प्राधिकरणाच्या कारवाईचा विकासकांना धसका
property developers Kalyan seized
कल्याणमधील २६ विकासकांच्या ११४ कोटींच्या मालमत्ता जप्त, ८८ हजार ८७६ चौरस मीटरच्या मालमत्तांचा लिलाव

हेही वाचा – Mumbai Metro 2A and 7 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रो २ अ आणि ७ चं लोकार्पण!

याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण फसवणुकीची रक्कम १० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्यामुळे हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेच्या एमपीआयडी कक्षाकडे वर्ग करण्यात आले. आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४०९ (एजंट किंवा मध्यस्थांकडून विश्वासाचा भंग करणे), १२० बी (गुन्हेगारी कट) आणि ३४ (सामान्य हेतू) आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण (एमपीआयडी) कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – “मुंबई आणि महाराष्ट्रात राहायचं असेल तर…”, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

नागपाल व इतर ४४ जणांची फसवणूक करण्यात आली असून त्यात बहुसंख्य ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. तक्रारीनुसार जानेवारी २००९ ते जानेवारी २०२३ या कालावधीत गुंतवणुकदारांनी आरोपी कंपनीत मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवली होती. त्यांना मुदत ठेवींवर १४ ते २१ टक्के व्याज देण्याचे आमीष दाखवण्यात आले होते. सुरूवातीला गुंतवणुकदारांना गुंतवणुकीवर व्याज मिळाले. त्यामुळे त्यांनी मोठ्या रकमेची गुंतवणूक केली. त्यानंतर गुंतवणुकदारांना रक्कम मिळणे बंद झाले. पैसे परत मिळवण्यासाठी गुंंतवणुकदारांनी पाठपुरावा केला असता कंपनीने गुंतवणुदारांना धनादेश दिला. पण तो वठला नाही. त्यामुळे ४५ गुंतवणुकदारांनी १६ कोटी ४५ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली.