मुंबई : मध्य रेल्वेवरील पाचव्या-सहाव्या मार्गिकेतील अडथळे दूर करण्यासाठी चुनाभट्टी-टिळनगरदरम्यान उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. या मार्गिकेसाठी हार्बरवरील कुर्ला स्थानकही उन्नत केले जाणार असून या प्रकल्पाचे केवळ ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हार्बरवरील कुर्ला उन्नत मार्गासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

कुर्ला येथून सीएसटीपर्यंत पाचवी-सहावी मार्गिका टाकण्यासाठी मध्य रेल्वेला जागेची अडचण भासत आहे. त्यामुळे चुनाभट्टी-टिळकनगर दरम्यान उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. या स्थानकांदरम्यान येणारे हार्बरवरील कुर्ला स्थानकही उन्नत करण्यात येणार आहे. कुर्ला स्थानकात दोन अतिरिक्त मार्गिका उपलब्ध असल्या तरी त्या मालगाडीच्या वाहतुकीसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे त्या मार्गिका वापरता येणार नाहीत. परिणामी, या स्थानकातील हार्बर मार्गावरील दोन फलाट आठ मीटर उंचीवर उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी टिळकनगर स्थानकापुढे सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्याखालून रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल कुर्ला स्थानकातून पुढे कसाईवाडा पुलाजवळ उतरेल आणि तेथून सध्याच्या मार्गाला जोडला जाईल.

Landing of Manishnagar flyover is dangerous
नागपूर : मनीषनगर उड्डाणपुलाची ‘लँडिंग’ धोकादायक
Bridge in sea to connect Bandra Worli Sea Bridge and Sea Coast Road
वांद्रे वरळी सागरी सेतू आणि सागरी किनारा मार्गाला जोडण्यासाठी समुद्रात पूल
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
rail line to Karjat
कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग, पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग डिसेंबर २०२५ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य

सध्या टिळकनगरच्या दक्षिण बाजूकडून आणि कुर्ला स्थानकाच्या बाजूने १.१ किलोमीटरचा उन्नत मार्ग उभारण्याचे काम सुरू आहे. गेल्या पाच वर्षांपासून या प्रकल्पातील मार्गिकेचे काम सुरू आहे. उन्नत मार्गिकेची अंतिम मुदत जानेवारी २०१९ होती. ही मुदत अनेक वेळा वाढविण्यात आली. आतापर्यंत या मार्गिकेचे ४५ टक्के काम पूर्ण झाले असून संपूर्ण मार्ग २०२३ मध्ये पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले. उन्नत मार्ग ११२० मीटर लांब आणि ५९ मीटर रुंद आहे.

कामासाठी ८९० कोटी रुपये मंजूर 

आतापर्यंत कुर्ला ते कल्याणदरम्यानच्या पाचव्या, सहाव्या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. कुर्ला ते परळ आणि परळ ते सीएसएमटी दरम्यानच्या पाचव्या, सहाव्या मार्गाचे काम बाकी आहे. या कामासाठी एकूण ८९० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मशीद बंदर रोड, सॅन्डहस्र्ट रोड, दादर ते परळ, भायखळा येथील अतिक्रमणे आणि खासगी जागा इत्यादींमुळे या प्रकल्पाचे काम रखडले आहे.