मुंबई : मध्य रेल्वेवरील पाचव्या-सहाव्या मार्गिकेतील अडथळे दूर करण्यासाठी चुनाभट्टी-टिळनगरदरम्यान उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. या मार्गिकेसाठी हार्बरवरील कुर्ला स्थानकही उन्नत केले जाणार असून या प्रकल्पाचे केवळ ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हार्बरवरील कुर्ला उन्नत मार्गासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुर्ला येथून सीएसटीपर्यंत पाचवी-सहावी मार्गिका टाकण्यासाठी मध्य रेल्वेला जागेची अडचण भासत आहे. त्यामुळे चुनाभट्टी-टिळकनगर दरम्यान उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. या स्थानकांदरम्यान येणारे हार्बरवरील कुर्ला स्थानकही उन्नत करण्यात येणार आहे. कुर्ला स्थानकात दोन अतिरिक्त मार्गिका उपलब्ध असल्या तरी त्या मालगाडीच्या वाहतुकीसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे त्या मार्गिका वापरता येणार नाहीत. परिणामी, या स्थानकातील हार्बर मार्गावरील दोन फलाट आठ मीटर उंचीवर उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी टिळकनगर स्थानकापुढे सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्याखालून रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल कुर्ला स्थानकातून पुढे कसाईवाडा पुलाजवळ उतरेल आणि तेथून सध्याच्या मार्गाला जोडला जाईल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 45 percent work on elevated station in kurla completed zws
First published on: 17-08-2022 at 00:28 IST