मुंबई : करोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. मंगळवारी दिवसभरात ४७९ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या ११ लाख २८ हजार ४३३ वर पोहोचली आहे, तर दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे मृतांची संख्या १९ हजार ६६० वर स्थिरावली आहे. करोनाबाधित ४७९ रुग्णांपैकी ३० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ३२९ रुग्णांनी करोनावर मात केल्याने आतापर्यंत ११ लाख ५ हजार ६४६ रुग्णांनी करोनाला हरवले आहे. मुंबईत सध्या ३ हजार १२७ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के आहे. दर रुग्णदुपटीचा दर १८५७ वर पोहोचला आहे.

ठाणे जिल्ह्यात १८९ बाधित

ठाणे जिल्ह्यात मंगळवारी १८९ नवे करोनाबाधित आढळून आले, तर जिल्ह्यात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नवी मुंबईत ७९, ठाणे ५८, मीरा-भाईंदर २८, कल्याण-डोंबिवली ११, ठाणे ग्रामीण आठ, भिवंडी तीन आणि उल्हासनगर पालिका क्षेत्रात दोन रुग्ण आढळून आले आहेत, तर ठाणे महापालिका क्षेत्रात एका रुग्णाचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत जिल्ह्यात करोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या १,११० आहे.