मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याने भाजपतर्फे देशभरात ३१ मे पासून महिनाभर महाजनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले असून राज्यात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक अशा ४८ सभा आयोजित करण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रत्येकी एक सभा राज्यात होणार असून त्याचे नियोजन करण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ नेते प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रवास करून सभाही घेणार आहेत. मोदी सरकारची विकासकामे व कल्याणकारी योजनांची माहिती महाजनसंपर्क अभियानातून ८० कोटी नागरिकांपर्यंत पोचविली जाणार आहे. देशभरात ५१ रॅली, ५०० हून अधिक सभा आणि ६०० हून अधिक पत्रकार परिषदा आयोजित केल्या जाणार आहेत. प्रत्येक लोकसभा मतदार संघात एक हजार अशा पद्धतीने सर्व लोकसभा मतदार संघांतील ५ लाखांहून अधिक विशेष कुटुंबांशी संपर्क साधला जाईल. लाभार्थी आणि ज्येष्ठ कार्यकर्ता संपर्क असे विविध कार्यक्रम लोकसभा, विधानसभा आणि मतदान केंद्र (बूथ) स्तरावर आयोजित केले जाणार आहेत, अशी माहिती अभियानाचे प्रदेश संयोजक आमदार प्रवीण दरेकर आणि भाजप मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी बुधवारी दिली.

muzaffar beg kashmir loksabha
काश्मीरमध्ये लोकसभेची पहिली जागा जिंकण्यासाठी भाजपा सज्ज; पहाडी नेते मुझफ्फर बेग यांना पक्षाचा पाठिंबा मिळेल का?
Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
narendra modi and sharad pawar
काँग्रेसच्या काळात एका रुपयाचे  १५ पैसे व्हायचे, आता मी एक बटण दाबले आणि…; पंतप्रधान माेदींकडून शरद पवार यांचे नाव न घेता टीका
pm Narendra Modi in Yavatmal
पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमार्गे यवतमाळात

राज्यात प्रत्येकी ४ लोकसभा मतदारसंघांचा एक विभाग करण्यात आला असून या मतदारसंघात राज्याचे प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी , उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, अनुराग ठाकूर, प्रल्हादसिंह पटेल, अजयकुमार मिश्रा, खासदार तीरथसिंह रावत , सदानंद गौडा , मध्य प्रदेशचे मंत्री अरिवद भदुरीया आदी नेते प्रवास करणार असल्याचे शेलार यांनी नमूद केले.

योजनांची तातडीने अंमलबजावणी

गेल्या ९ वर्षांत मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला गती दिल्यामुळे जगातील पहिल्या ५ अर्थव्यवस्थेत भारताचा समावेश झाला आहे. अपना परिवार अपना विकासह्ण हे धोरण बदलून सबका साथ, सबका विकासह्णचा नवा अध्याय रचला आहे. पूर्वी योजना व प्रकल्पांची केवळ घोषणा होत असे, मात्र अंमलबजावणी होत नव्हती. आता पायाभरणी आणि उद्घाटन दोन्ही एकाच सरकारच्या कालावधीत होत आहे. सरकारच्या कल्याणकारी योजनांचा १०० टक्के लाभ गरजूंपर्यंत पोचत आहे, असे शेलार यांनी सांगितले.