मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याने भाजपतर्फे देशभरात ३१ मे पासून महिनाभर महाजनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले असून राज्यात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक अशा ४८ सभा आयोजित करण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रत्येकी एक सभा राज्यात होणार असून त्याचे नियोजन करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ नेते प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रवास करून सभाही घेणार आहेत. मोदी सरकारची विकासकामे व कल्याणकारी योजनांची माहिती महाजनसंपर्क अभियानातून ८० कोटी नागरिकांपर्यंत पोचविली जाणार आहे. देशभरात ५१ रॅली, ५०० हून अधिक सभा आणि ६०० हून अधिक पत्रकार परिषदा आयोजित केल्या जाणार आहेत. प्रत्येक लोकसभा मतदार संघात एक हजार अशा पद्धतीने सर्व लोकसभा मतदार संघांतील ५ लाखांहून अधिक विशेष कुटुंबांशी संपर्क साधला जाईल. लाभार्थी आणि ज्येष्ठ कार्यकर्ता संपर्क असे विविध कार्यक्रम लोकसभा, विधानसभा आणि मतदान केंद्र (बूथ) स्तरावर आयोजित केले जाणार आहेत, अशी माहिती अभियानाचे प्रदेश संयोजक आमदार प्रवीण दरेकर आणि भाजप मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी बुधवारी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 48 meetings in the state in bjp mahajan samparak campaign amy
First published on: 01-06-2023 at 04:14 IST