मुंबई : नव्या वर्षात एसटीच्या ५० शयनयान बस कोकणात धावणार | 50 sleeper buses of ST will run in Konkan in Mumbai New Year mumbai print news amy 95 | Loksatta

मुंबई : नव्या वर्षात एसटीच्या ५० शयनयान बस कोकणात धावणार

खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांची वाढती स्पर्धा लक्षात घेऊन एसटी महामंडळाने काही वर्षांपूर्वी शिवशाही वातानुकूलित शयनयान बसगाड्या घेतल्या

मुंबई : नव्या वर्षात एसटीच्या ५० शयनयान बस कोकणात धावणार
नव्या वर्षात एसटीच्या ५० शयनयान बस कोकणात धावणार (संग्रहित छायाचित्र)

खासगी बस कंपन्यांची वाढती स्पर्धा लक्षात घेऊन एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या मार्गावरील अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विनावातानुकूलित शयनयान आणि आसन व्यवस्था असलेल्या स्वमालकीच्या बस ताफ्यात दाखल केल्या आहेत. आता एसटी महामंडळाने फक्त शयनयान प्रकारातील विनावातानुकूलित ५० नवीन बस ताफ्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या बस केवळ कोकणात ‘रातराणी’ म्हणून प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा >>> ‘आरे’साठी उद्या पर्यावरणप्रेमींची ऑगस्ट क्रांती मैदान ते मंत्रालय यात्रा

खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांची वाढती स्पर्धा लक्षात घेऊन एसटी महामंडळाने काही वर्षांपूर्वी शिवशाही वातानुकूलित शयनयान बसगाड्या घेतल्या. या बस सेवेत आल्यानंतर जादा भाडेदरामुळे प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरवली होती. महामंडळाने त्यांच्या भाडेदरात कपात केली. मात्र त्यालाही प्रतिसाद मिळत नसल्याने ही सेवा बंदच करण्यात आली. त्यामुळे एसटी महामंडळाचा वातानुकूलित शयनयान प्रयोग पूर्णपणे फसला. वातानुकूलित बसगाड्यापाठोपाठ नोव्हेंबर २०१९ मध्ये एकाच बसमध्ये शयनयान आणि आसन व्यवस्था असलेली विनावातानुकूलित बस महामंडळाने घेतली. या स्वमालकीच्या बस सेवेला काही प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सध्या अशा २१८ बस ताफ्यात आहे. आता महामंडळाने केवळ शयनयान प्रकारातील ५० बस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली असून बससाठी लागणारा सांगाडा टाटा कंपनीकडून घेण्यात येईल आणि त्यानंतर एसटी महामंडळ त्याची बांधणी करणार आहे. मार्च २०२३ पर्यंत या बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल करण्याचा प्रयत्न असेल. त्यानंतरच या बस प्रवाशांच्या सेवेत येतील. लांब पल्ल्याच्या मार्गावर या बस ‘रातराणी’ म्हणून चालवण्यात येणार असून त्यासाठी कोकणातील मार्गांचाही विचार करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा >>> म्हाडाचे पशुवैद्यकीय आणि स्त्री रुग्णालय बारगळले; प्रतिसादाअभावी निविदा रद्द

सध्या राज्यात एसटीच्या २५६ मार्गांवर ५०० हून अधिक बसगाड्या ‘रातराणी’ म्हणून धावत असून यात साध्या, निमआराम, तसेच शयन आणि आसन व्यवस्था असलेल्या बसचा समावेश आहे. शयन आणि आसन व्यवस्था असलेल्या बसमध्ये ३० पुश बॅक आसन व १५ शयनयान अशी प्रवासी क्षमता आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘आरे’साठी उद्या पर्यावरणप्रेमींची ऑगस्ट क्रांती मैदान ते मंत्रालय यात्रा

संबंधित बातम्या

“दोन शहाणे वाघ होते आणि एके दिवशी…”, गोष्ट सांगत सुषमा अंधारेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
मुंबईत ३ ते १७ डिसेंबर दरम्यान जमावबंदीचे आदेश; पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; काय सुरू काय बंद? जाणून घ्या
“एक पठ्ठ्या ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम…”, सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर बोचरी टीका
विश्लेषण: डोंगर आणि तलावाखालून जाणारा मुंबई-पुणे द्रुतगती बोगदा कसा आहे? त्याचा फायदा काय होईल?
‘तो’ कबुतराचं मांस चिकन म्हणून हॉटेल्सला विकायचा; मुंबईमधील धक्कादायक प्रकार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगावला येणं अनुकूल नाही”, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंचा इशारा
पोलीस उपनिरीक्षक विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेची निवड यादी जाहीर; यंदा डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शारीरिक चाचणी
‘मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या निर्णयाला जाणीवपूर्वक उशीर’; शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा आरोप
विजय दिवस सोहळ्यात यंदा भरगच्च कार्यक्रम; रौप्यमहोत्सवानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, शरद पवार यांना निमंत्रण
FIFA WC 2022: मोक्याच्या क्षणी ह्वांग ही चॅन चा गोल! द. कोरिया बाद फेरीत दाखल, मात्र जिंकूनही उरुग्वे विश्वचषकातून बाहेर