मुंबई : कल्याण शिळफाटा ते भिवंडी या रस्त्याचे सहापदरी रुंदीकरण करण्यासाठी ५६१ कोटी रुपयांच्या वाढीव खर्चास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या कामासाठी राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला ( एमएसआरडीसी) हा निधी देण्यात येणार आहे.

कल्याण शिळफाटा ते भिवंडी या २१ कि.मि. लांबीच्या रस्त्याचे सहापदरी रुंदीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. प्रकल्प अहवालानुसार उड्डाणपुल, रेल्वेवरील पुल, पुलाचे पोचमार्ग, जंक्शन सुधारणा, सूचना फलके व तत्सम अनुशंगिक कामासाठी ३८९ कोटी ६३ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. परंतु कल्याण शहरातील रेल्वे पत्री उड्डाण पुलाच्या कामात झालेली वाढ, तसेच रस्त्याचे डांबरीकरणाऐवजी क्रांक्रीटीकरणाने सहापदरी रुंदीकरण करणे, इतर नवीन कामांची भर पडल्यामुळे तसेच बांधकाम खर्चात वाढ झाल्याने प्रकल्पाचा एकूण खर्चही वाढला आहे. त्यास मान्यताद्यावी, असा प्रस्ताव एमएसआरडीसीने राज्य शासनाकडे पाठविला होता.

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात
boat
पालघर: कृत्रिम भित्तिका समुद्रात सोडणारी बोट सातपाटीच्या खडकावर अडकली
Mumbaikars should have a referendum on Mahalakshmi Race Course proposal ex-BJP corporators demand
महालक्ष्मी रेसकोर्सच्या प्रस्तावावर मुंबईकरांचे सार्वमत घ्यावे, भाजपच्या माजी नगरसेवकांची मागणी

राज्य शासनाने या आधी एमएसआरडीसीला १०५ कोटी रुपये दिले होते, ते वजा करून उर्वरित ४५६ कोटी ८५ लाख रुपये राज्य शासनाच्या निधीतून एमएसआरडीसीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.