मुंबई : मुंबईमध्ये रविवारी मकर संक्रांतीच्या निमित्ताने इमारतीच्या गच्च्या, मैदाने, मोकळय़ा जागांवर पतंगबाजी रंगली होती. मात्र, यामुळे ६४ पक्षी जखमी झाले आहेत. सर्वाधिक कबुतरे जखमी झाली.

मकर संक्रांतीनिमित्त रविवारी मुंबईमध्ये पतंग उडवण्यासाठी वापरण्यात आलेला मांजा हा अनेक पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरला आहे. सकाळपासून लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वानी पतंगबाजीचा आनंद लुटला असला तरी हा आनंद अनेक पक्ष्यांच्या जिवावर बेतला. घारी, घुबडे, कोकिळा असे पक्षी जखमी झाले. मात्र, यामध्ये सर्वाधिक कबुतरे होती. पतंगाच्या मांज्यामुळे जखमी झालेल्या ५७ कबुतरांवर उपचार करून त्यांना कबुतरखान्यात सोडण्यात आले. तर जखमींपैकी सात पक्षी गंभीर जखमी झाले असून यामध्ये दोन घारी, दोन कोकिळा, दोन कबुतरे आणि एक घुबडीचा समावेश आहे, अशी माहिती ‘दि बाई साकरबाई दिनशॉ पेटीट हॉस्पिटल फॉर अ‍ॅनिमल’चे डॉ. मयूर डांगर यांनी दिली.

bjp to defeat mamta banerjee in loksabha
ममतादीदींच्या तृणमूलचा पराभव करण्यासाठी भाजपाला ‘या’ जागा जिंकण्याची गरज; पश्चिम बंगालमध्ये पक्षाची स्थिती काय?
bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित