scorecardresearch

Premium

पश्चिम रेल्वेच्या ‘प्रवासी सुरक्षा’ मोहिमेत ६७४ जणांना अटक

मोहिमेद्वारे या वर्षांच्या सुरुवातीपासून २० सप्टेंबपर्यंत विविध  प्रकरणात ६७४ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

signal failur
( संग्रहित छायाचित्र )

मुंबई : पश्चिम रेल्वेवर रेल्वे सुरक्षा दलाकडून ‘प्रवासी सुरक्षा’ मोहीम राबवली जात आहे. मोहिमेद्वारे या वर्षांच्या सुरुवातीपासून २० सप्टेंबपर्यंत विविध  प्रकरणात ६७४ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संशयित हालचालींवर पाळत ठेवून, गुन्हेगारी प्रकरणे उघडकीस आणली.

  गर्दीच्या स्थानकांतील प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी चार प्रकारांतील सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेऱ्यांची स्पष्टता, चित्रीकरण करण्याची क्षमता यावरून हे प्रकार पडले आहेत. पश्चिम रेल्वेवर सध्या ३,८५७ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यामधील चेहरा ओळख प्रणाली (एफआरएस)चे ४८८ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये प्रत्येक व्यक्तीचा चेहरा, रंग, स्वभाव आणि वस्तूच्या रचना टिपल्या जातात. या सर्व बाबींचा दस्ताऐवज तयार होतो. त्याद्वारे त्या व्यक्ती, वस्तूचा शोध घेणे शक्य होते. या प्रणालींमध्ये ज्ञात गुन्हेगारांचा, प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा ‘प्रवासी सुरक्षा’ मोहिमेद्वारे शोध घेतला जातो, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

cctv camera in central railway
मुंबई: रेल्वे डब्यांत अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेचा निर्णय
Tata Consultancy Services (TCS)
TCS मध्ये वर्क फ्रॉम होम संपुष्टात? १ ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ५ दिवस कार्यालयात जावे लागणार
50,000 crore fund raising possible September bonds
रोख्यांच्या माध्यमातून सप्टेंबरमध्ये ५०,००० कोटींपर्यंत निधी उभारणी शक्य
panvel Municipal Corporation approved funds for concrete road construction in agm
पनवेल महापालिकेच्या उपनगरांमध्ये कॉंक्रीटच्या रस्ते बांधणीचा श्रीगणेशा; ४२१ कोटींच्या निधीला सर्वसाधारण सभेत मंजूरी

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 674 people arrested in western railway passenger safety campaign ysh

First published on: 28-09-2023 at 01:08 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×