मुंबईत मंगळवारी पुन्हा एकदा दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाचा बुधवारी मुक्काम कायम होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत सरासरी कमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ६९ टक्के पाऊस पडला आहे. तर गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये ८५ टक्के पाऊस झाला होता.

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सात तलावांतील पाणीसाठा ९६.६ टक्क्यांवर पोहोचला आहे.
सातही तलावांमध्ये सध्या १३ लाख ९० हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

Change in traffic route due to Rath Yatra after ram navami in nashik
नाशिक : रथयात्रेमुळे वाहतूक मार्गात बदल
water supply through tankers
दुष्काळ ; ५,००० गावे टँकरग्रस्त
Solapur recorded the highest degree Celsius maximum temperature in the state
दोन दिवस होरपळीचे! विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, रात्रीच्या उकाडय़ातही वाढीचा अंदाज
mukhtar ansari death gangster turned politician buried near his parents graves in ghazipur
मुख्तार अन्सारीच्या मृतदेहाचे दफन

दरम्यान, बुधवारी देखील दिवसभर ढगाळ हवामान राहील. काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. गेल्या चोवीस तासांत पश्चिम उपनगरात सर्वाधिक ६२.२० मिमी पावसाची नोंद झाली. तर शहर भागात ४९.३० मिमी, पूर्व उपनगरात ५६.६२ मिमी पाऊस पडला.

मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६९.३८ टक्के पाऊस पडला आहे. दरवर्षी जून ते सप्टेंबर या काळात मुंबईत सुमारे २२०० मिमी पाऊस पडतो. आतापर्यंत १८००मिमी पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये उपनगरात ९३ टक्के पाऊस पडला होता.

तीन वर्षांचा १७ ऑगस्टपर्यंतचा जलसाठा

वर्ष —– पाणीसाठा ( दशलक्ष लिटरमध्ये) …..टक्केवारी

२०२२ – १३,९०,२७४ …… ९६.०६

२०२१ – १२,०४,५४२ …. ८३.२२

२०२० – ११,४४,६७३ ….. ७९.०९