मुंबईत वार्षिक सरासरीच्या ६९ टक्के पाऊस ; बुधवारीही पावसाची शक्यता | 69 percent of annual average rainfall in Mumbai print news amy 95 | Loksatta

मुंबईत वार्षिक सरासरीच्या ६९ टक्के पाऊस ; बुधवारीही पावसाची शक्यता

मुंबईत मंगळवारी पुन्हा एकदा दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाचा बुधवारी मुक्काम कायम होता.

मुंबईत वार्षिक सरासरीच्या ६९ टक्के पाऊस ; बुधवारीही पावसाची शक्यता
संग्रहित छायाचित्र

मुंबईत मंगळवारी पुन्हा एकदा दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाचा बुधवारी मुक्काम कायम होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत सरासरी कमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ६९ टक्के पाऊस पडला आहे. तर गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये ८५ टक्के पाऊस झाला होता.

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सात तलावांतील पाणीसाठा ९६.६ टक्क्यांवर पोहोचला आहे.
सातही तलावांमध्ये सध्या १३ लाख ९० हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

दरम्यान, बुधवारी देखील दिवसभर ढगाळ हवामान राहील. काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. गेल्या चोवीस तासांत पश्चिम उपनगरात सर्वाधिक ६२.२० मिमी पावसाची नोंद झाली. तर शहर भागात ४९.३० मिमी, पूर्व उपनगरात ५६.६२ मिमी पाऊस पडला.

मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६९.३८ टक्के पाऊस पडला आहे. दरवर्षी जून ते सप्टेंबर या काळात मुंबईत सुमारे २२०० मिमी पाऊस पडतो. आतापर्यंत १८००मिमी पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये उपनगरात ९३ टक्के पाऊस पडला होता.

तीन वर्षांचा १७ ऑगस्टपर्यंतचा जलसाठा

वर्ष —– पाणीसाठा ( दशलक्ष लिटरमध्ये) …..टक्केवारी

२०२२ – १३,९०,२७४ …… ९६.०६

२०२१ – १२,०४,५४२ …. ८३.२२

२०२० – ११,४४,६७३ ….. ७९.०९

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मुंबई : परदेशी चलनाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

संबंधित बातम्या

विश्लेषण: प्रदूषण पातळीत मुंबई दिल्लीच्याही पुढे का? मुंबईची हवा इतकी का खालवली?
४०० गाळे बीडीडीवासीयांनाच; सेंच्युरी मिलमधील बीडीडीवासीयांची घरे प्रकल्पबाधितांना देण्याचा घाट उधळला
आता पोलीस हवालदारपदासाठी तृतीयपंथीयांनाही अर्ज करणे शक्य
‘म्हाडा’ लेआऊट मंजुरीचा मार्ग मोकळा!
बाजारगप्पा : दादरचा ‘फुल्ल’बाजार

व्हिडिओ

ताज्या बातम्या
आता पोलीस हवालदारपदासाठी तृतीयपंथीयांनाही अर्ज करणे शक्य
Himachal Pradesh Election 2022 : काँग्रेसपुढे नेतानिवडीचा पेच; मुख्यमंत्रीपदावर तिघांचा दावा
अनुराग ठाकूर यांच्या जिल्ह्यात सर्व जागांवर भाजप पराभूत!; प्रेमकुमार धुमल यांना उमेदवारी नाकारल्याने नाराजी
शरद पवारांसह राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे?
India Bangladesh 3rd ODI : बांगलादेशविरुद्ध सपशेल अपयशाची नामुष्की टाळण्याचे भारताचे लक्ष्य!