मुंबई : निरनिराळ्या क्लृप्त्या लढवून विदेशातून चलन, सोने, हिरे आणि मौल्यवान वस्तू भारतात आणण्याचे प्रकार सुरूच आहेत. सीमा शुल्क विभागाने मुंबई विमानतळावर कारवाई करून दोन पुस्तकांमध्ये दडविलेले ९० हजार यूएस डॉलर (७३ लाख रुपये), तसेच, अंतवस्त्रात दडवून आणलेली २.५ किलो सोन्याची पावडर जप्त केली. या प्रकरणात दोघांना विमातळावरच पकडण्यात आले असून सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी सर्व ऐवज जप्त केला आहे.

मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या दोन विदेशी प्रवाशांवर सीमा शुल्क विभागातील अधिकाऱ्यांना संशय आला. त्या दोघांची तपासणी केली असता त्यांच्याकडील दोन पुस्तकात विदेशी नोटा आणि अंतवस्त्रात पावडर स्वरूपातील सोने आढळून आले. सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी २२ आणि २३ जानेवारी रोजी कारवाई करून या विदेशी नागरिकांना  अटक केली, अशी माहिती मुंबईच्या सीमा शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. या दोघांकडे असलेल्या पुस्तकांच्या पानांमध्ये लपवलेले ९० हजार डॉलर जप्त केले. तसेच अंतवस्त्रात लपवलेले पावडर स्वरूपातील २.५ किलो सोने जप्त करण्यात आले. या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराचा सीमा शुल्क अधिकारी शोध घेत आहेत.

apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
Using skin lightening cream can cause kidney cancer
सावधान! त्वचा उजळणारे क्रिम वापरताय तर हे नक्की वाचा…