scorecardresearch

Premium

मुलींना शेजाऱ्यांकडे ठेवत असाल तर सावधान! मुंबईत आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, पीडितेने सांगितली आपबिती

काही दिवसांपूर्वी घडलेली आपबिती या आठ वर्षीय चिमुकलीने आपल्या आईला सांगितली.

rape in mumbai
जोगेश्वरीमध्ये चिमुकलीवर बलात्कार (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई सर्वाधिक सुरक्षित शहर असल्याचं म्हटलं जातं. परंतु, मुंबईत होत असलेले महिला अत्याचार सातत्याने समोर येत आहेत. धक्कादायक म्हणजे हे अत्याचार अनोळखी लोकांकडून न होता ओळखीच्या व्यक्तींकडूनच होत आहेत. मुंबईतील जोगेश्वरी परिसरातही असाच धक्कादायक प्रकार घडला आहे.

आठ वर्षीय चिमुकली पीडिता तिच्या आईसोबत जोगेरश्वरी येथे राहते. तिची आई विश्वासाने आपल्या मुलीला शेजाऱ्यांकडे ठेवून कामाला जात असे. घरात मुलीची देखरेख करण्यासाठी कोणी नसल्याने आई मुलीला शेजाऱ्यांकडे ठेवत होती. परंतु, याचा फायदा नराधमाने घेतला. ५३ वर्षीय नराधमाने या आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केला. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

pankaja munde, obc, devendra fadnavis, BJP, politics
सततच्या ‘कोंडी’त पंकजा मुंडे, नाराजीचा परिघ देवेंद्र फडणवीसांपासून अमित शहांपर्यंत
gopichand padalkar on ajit pawar
“पडळकरांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गट आक्रमक
Ganesh Utsav 2023
Ganesh Utsav 2023: २५० किमीचा ट्रक प्रवास करुन वैजापुरात आले गणराय, भव्य मूर्तीचं जोरदार स्वागत
rahul narvekar eknath shinde uddhav thackrey
आमदार अपात्रता सुनावणी तीन आठवडे लांबणीवर; तात्काळ निर्णय देण्याची ठाकरे गटाची मागणी

काही दिवसांपूर्वी घडलेली आपबिती या आठ वर्षीय चिमुकलीने आपल्या आईला सांगितली. त्यामुळे आईने तत्काळ पोलिसांत धाव घेऊन संबंधित आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पीडिता आणि तिच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३७६ आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून घेतला आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 8 year old girl allegedly raped in mumbais jogeshwari area sgk

First published on: 27-09-2023 at 12:56 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×