मुंबई : राज्यात तब्बल ८१ हजार १३७ कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्याोग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली.

कोकण, मराठवाडा, विदर्भात उभ्या राहणाऱ्या या प्रकल्पांतून सुमारे २० हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम आयन सेल/बॅटरी, इलेक्ट्रिक व्हेईकल, सेमीकंडक्टर चिप्स, सोलर पीव्ही मॉड्युल्स आणि इलेक्ट्रोलायझर, फळांचा पल्प आणि रस यावर आधारित उत्पादन करणाऱ्या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे.

हेही वाचा >>>माध्यान्ह भोजन योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जा तपासा, उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश

सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्याोगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव सुजाता सौनिक, उद्याोग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.

राज्यात उद्याोगांना चालना देण्यासाठी सामूहिक प्रोत्साहन योजना जाहीर करण्यात आली आहे. येत्या काळात आणखी उद्याोग राज्यात येतील, याचा विश्वास आहे. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री