मुंबई : मुंबईतील घरविक्रीत जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये मोठी घट झाली आहे. मुंबईत या महिन्याभरात ८५५२ घरांची विक्री झाली असून यात मुद्रांक शुल्काच्या रूपाने ६४३ कोटी रुपयांचा महसूल राज्य सरकारला मिळाला आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये मुंबईत ८५५२ घरांची विक्री झाली आहे. यातून ६४३ कोटींचा महसूल मिळाला आहे.
हेही वाचा >>> आरे कारशेड सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर ; आता होणार २७ सप्टेंबरला सुनावणी
२०२२ मधील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी अशी घरविक्री आहे. जानेवारीत ८१५५ घरे विकली गेली होती. त्यानंतर मात्र घरविक्रीत चांगली वाढ झाली.फेब्रुवारीत घरविक्रीने १० हजारांचा तर मार्चमध्ये थेट १६ हजारांचा पल्ला गाठला होता. एप्रिलमध्येही घरविक्री स्थिर होती.११७४३ घरे या महिन्यात विकली गेली होती.
हेही वाचा >>> तेरा वर्षांपूर्वी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा ; पुराव्यांअभावी पुरवठादाराची निर्दोष सुटका
मे आणि जूनमध्ये पुन्हा घरविक्री थंडावली. उन्हाळ्याची सुट्टी आणि पावसाळा यामुळे या काळात घरविक्रीत घट होताना दिसते. परिणामी मे आणि जूनमध्ये १० हजाराच्या आता घरविक्री झाली. जुलैमध्ये मात्र घरविक्रीत काहीशी वाढ झाली आणि या महिन्यात ११३४० घरे विकली गेली. पण आता ऑगस्टमध्ये घरविक्रीत मोठी घट पाहायला मिळत आहे. घरविक्री आणि महसूल दोन्हीमध्ये घट झाली आहे.
मे ते ऑगस्टदरम्यान नेहमीच घरविक्री कमी होते. आता सण येत आहेत. त्यामुळे आता सप्टेंबरपासून डिसेंबरपर्यंत घरविक्रीला चांगले दिवस येतील. सणासुदीला घरखरेदी करणे ही भारतीय – आनंद गुप्ता, अध्यक्ष, हाऊसिंग आणि रेरा कमिटी, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया