झोपाळ्याच्या दोरीचा फास लागून मुलाचा मृत्यू

अंधेरीच्या गावदेवी डोंगर परिसरातील कामा रोड येथील झोपडपट्टीत शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : घरातील झोपाळ्यावर झोका घेताना दोरीचा फास बसून शनिवारी अंधेरी येथे एका नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून घातपाताची शक्यता  तूर्त फेटाळली आहे.

अंधेरीच्या गावदेवी डोंगर परिसरातील कामा रोड येथील झोपडपट्टीत शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृत मुलाचे नाव ईस्माईल आघा असे होते. आई वडील आणि दोन भावंडांसह राहत होता. घरात दोरीच्या साहाय्याने बनवण्यात आलेल्या झोपाळ्यावर ईस्माईल झोका घेत होता. त्याची आई बाजूच्या खोलीमध्ये झोपली होती. त्याची बहीण खोलीत आली असता ईस्माईलला फास बसल्याचे तिने पाहिले. तिने हा प्रकार आईला सांगितला. आईने ईस्माईलला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी ईस्माईलला मृत घोषित केले. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 9 year old andheri boy dies after getting entangled in homemade swing zws

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा