मुंबई: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला कलाटणी देणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. मनात जिद्द असली की कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत यशाचे शिखर सर करता येते, हे अनेक विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. मुंबईतील लोअर परळ स्थानकाबाहेर गेल्या अनेक वर्षांपासून वृत्तपत्रांची विक्री करणाऱ्या प्रसाद भोसले यांच्या मुलीने, दुर्वा भोसले हिने ९४.८०% गुण संपादन करून घवघवीत यश प्राप्त केले. दुर्वाच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोअर परळ येथील डिलाईल रोड परिसरात दुर्वा दहा जणांच्या एकत्रित कुटुंबात राहते. मात्र घरातील गजबजाटाचा कसलाही परिणाम तिने आपल्या अभ्यासावर होऊ दिला नाही. स्वयंअभ्यासाला तिने जास्त वेळ दिला आणि विविध विषयांवर लक्ष केंद्रित केले. दुर्वाला आता विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन, भविष्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचे आहे. दादरमधील आय. ई.एस.माॅर्डन इंग्लिश शाळेची ती विद्यार्थिनी असून, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि कुटुंबातील सदस्यांना तिने यशाचे श्रेय दिले आहे.

हेही वाचा… जिद्दीच्या जोरावर रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी; मुंबई सेंट्रलमधील मॉडर्न रात्रशाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के

आई-वडील आपली स्वप्ने मुलांमध्ये पहात असतात. त्यासाठी ते कठोर परिश्रमही घेतात. मात्र स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी मुलांकडूनही अथक परिश्रम, जिद्द, आणि चिकाटीची जोड लागते. मुंबईतील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना अभिमान वाटेल असेच हे यश आहे असे म्हणत बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे सरचिटणीस संजय चौकेकर आणि विश्वस्त तसेच दुर्वाचे काका जीवन भोसले यांनी तिचे अभिनंदन केले आहेत. तर तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 94 80 percent marks in ssc to daughter of newspaper seller from lower parel mumbai print news dvr
First published on: 03-06-2023 at 12:53 IST