scorecardresearch

मुंबई : फेब्रुवारीत ९५८२ घरांची विक्री; घरविक्रीतून विक्रमी महसूल

राज्याला फेब्रुवारीत केवळ नऊ हजार ५८२ घरांच्या विक्रीतून एक हजार १०६ कोटी रुपये महसूल मिळाला आहे.

houses sold in mumbai in february 202
प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

मुंबईमध्ये फेब्रुवारी महिन्यात घरविक्रीत वाढ होईल आणि साधारण १० हजारांहून अधिक घरांची विक्री होईल, असा अंदाज बांधकाम व्यवसायीकांकडून व्यक्त होत होता. मात्र फेब्रुवारीमधील दस्त नोंदणीच्या अखेरच्या दिवशी (सायंकळी ६ वाजेपर्यंत) नऊ हजार ५८२ घरांची विक्री झाल्याचे निदर्शनास आले. मात्र या घरविक्रीतून विक्रमी महसूल मिळाला आहे. राज्याला फेब्रुवारीत केवळ नऊ हजार ५८२ घरांच्या विक्रीतून एक हजार १०६ कोटी रुपये महसूल मिळाला आहे.

हेही वाचा >>> Video: “१०० सोडा, मी शिंदेना पाच फोन जरी केले असतील तर…”; मोहित कंबोज यांच्या आरोपानंतर भास्कर जाधव आक्रमक!

एकूणच २०२२ मध्ये घरविक्री स्थिर होती. नव्या वर्षातही (२०२३) घरविक्री स्थिर असल्याचे चित्र आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी २०२३ मध्ये मुंबईत ९००१ घरांची विक्री झाली होती. त्याद्वारे ६९१ कोटी रुपये महसूल मिळाला होता. फेब्रुवारीत घरविक्रीत मोठी वाढ झालेली नाही. मंगळवारी दस्त नोंदणीच्या शेवटच्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत नऊ हजार २४२ घरांची विक्री झाली. या घरविक्रीतून राज्याला एक हजार ०८२ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. दस्त नोंदणीचा आजचा शेवटचा दिवस असल्याने रात्री उशिरापर्यंत घरविक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, घरविक्री स्थिर असली तरी महसुलात मात्र चांगली वाढ झाली आहे. मागील महिन्यात जानेवारीत नऊ हजार एक घरे विकली गेली होती आणि त्यातून ६९१ कोटी रुपये महसूल मिळाला होता. २०२२ मधील महसुलाचा विचार करता मार्चमध्ये सर्वाधिक एक हजार १६० कोटी रुपये महसूल मिळाला होता. मात्र त्यावेळी घरांची विक्रमी विक्री झाली होती. मार्च २०२२ मध्ये १६ हजार ७२६ घरांच्या विक्रीतून एक हजार १६० कोटी रुपये महसूल मिळाला होता. फेबुवारी २०२३ मध्ये केवळ नऊ ५८२ घरांच्या विक्रीतून एक हजार १०६ कोटी रुपये महसूल मिळाला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 19:05 IST