scorecardresearch

Premium

मुंबई : शिवाजी पार्कमधील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात आढळले मगरीचे पिल्लू

मुंबई महानगरपालिकेच्या शिवाजी पार्क येथील जलतरण तलाव परिसरात मंगळवारी सकाळी मगरीचे पिल्लू आढळले.

crocodile swimming pool Shivaji Park
मुंबई : शिवाजी पार्कमधील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात आढळले मगरीचे पिल्लू (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शिवाजी पार्क येथील जलतरण तलाव परिसरात मंगळवारी सकाळी मगरीचे पिल्लू आढळले. यापूर्वी या जलतरण तलावाच्या परिसरात साप, अजगर आढळले आहेत. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

दादर शिवाजी पार्क परिसरात गेल्या २० वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेचा जलतरण तलाव आहे. या तलावात पोहायला येणाऱ्यांची सदस्य संख्या मोठी आहे. लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सगळे जण या जलतरण तलावात पोहोण्यासाठी येत असतात. मात्र गेल्या चार पाच महिन्यांत या ठिकाणी वारंवार साप आढळत होते. तर ३ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता जलतरण तलावात दोन फूट लांबीचे मगरीचे पिल्लू आढळले. जलतरण तलाव पोहोण्यासाठी सुरू करण्याआधी नियमितपणे पाहणी करण्यात येते. तशी ती आजही करण्यात आली. त्यावेळी हे पिल्लू आढळले. हे पिल्लू वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले.

Health workers Mumbai Mnc
मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेविकांचे बुधवारी ठिय्या आंदोलन
central railway mega block
पनवेल येथे पाच दिवसांसाठी मध्यरात्रीचा ब्लॉक
forest department driver killed in wild elephant attack in desaiganj taluka
गडचिरोली : रानटी हत्तीच्या हल्ल्यात वनविभागाचा वाहनचालक ठार; देसाईगंज तालुक्यातील घटना
Chimur taluka Wardha border, fear spread villagers presence tiger
वाघाने जिल्हा सोडला पण डरकाळ्या सुरूच; शाळा ओस तर वन कर्मचारी त्रस्त

हेही वाचा – नवे विमानतळ मुंबईच्या आणखी जवळ; शिवडी न्हावा शेवा पुलापासून विमानतळापर्यत थेट सागरी किनारा मार्ग

हेही वाचा – मुंबईत १०४ ते १०७ टक्के पर्जन्यमान

यापूर्वी जलतरण तलावाच्या पंप हाऊसमध्ये साप आढळला होता. त्यापूर्वीही अनेकदा जलतरण तलाव परिसरात साप आढळल्याचे येथील सभासदांनी सांगितले. त्यामुळे जलतरण तलावात पोहायला येणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वारंवार साप आढळत असल्यामुळे जलरण तलावाच्या ठिकाणी सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करण्यात आले होते. दरम्यान, जलतरण तलावाला लागूनच एक छोटे प्राणीसंग्रहालय असून तिथून हे साप व प्राणी येत असल्याची सभासदांमध्ये चर्चा आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A baby crocodile was found in the municipal swimming pool in shivaji park mumbai print news ssb

First published on: 03-10-2023 at 11:47 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×