तेलाचा टँकर पलटल्याने घोडबंदर रोडवर मोठी वाहतूक कोंडी

चालक किरकोळ जखमी

मुंबईत जेएनपीटीहून सिल्वासाकडे निघालेला एक तेलाचा टँकर घोडबंदर रोड येथे पलटला. यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घोडबंदर रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

तेलाच्या टँकरला झालेल्या अपघातानंतर त्याचे झाकण उघडले गेल्याने संपूर्ण तेल रस्त्यावर सांडले गेल्याने वाहतुक रोखण्यात आली आहे. या टँकरचा चालक जीतलाल पाल (वय ३५) किरकोळ जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे ठाण्याहून घोडबंदरमार्गे बोरिवलीच्या दिशेने जाणा-या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे.

अपघाताची माहिती कळताच अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पलटी झालेला कंटेनर हटवण्याचे काम सुरू झाले. मात्र, मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर तेल पसरल्याने या कामामध्ये अडथळे निर्माण होत आहे. मात्र, युद्ध पातळीवर काम सुरु आहे. पोलिस पुढील चौकशी करीत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: A big traffic congestion on ghodbunder road overturning the oil tanker