मुंबई : वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इस्लामिक धर्मगुरू मुफ्ती सलमान अझहरी यांना मुंबईतून अटक करण्यात आल्यानंतर अटकेला विरोध करण्यासाठी घाटकोपर पोलीस ठाण्यात जमाव जमावणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या मदतीने १६ जणांविरोधात दगडफेक करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व बेकायदेशीर जमाव गोळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. अझहरी यांच्या अटकेबाबत समजताच त्यांच्या समर्थकांनी घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. बारा तासांहून अधिक वेळ पोलीस ठाण्याबाहेर समर्थक जमले आहेत.

जुनागड न्यायालयाजवळील नारायण विद्या मंदिराच्या मैदानावर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमात अझहरी यांनी ३१ जानेवारी रोजी वादग्रस्त भाषण केले होते. त्याची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित होताच कारवाईची मागणी वाढली. जुनागड पोलिसांनी कार्यक्रमाचे आयोजक मुहम्मद युसूफ मलिक, अझीम हबीब ओडेदारा आणि मुफ्ती सलमान अझहरी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. गुजरात पोलिसांनी दोघांना अटक करत अझहरी यांचा शोध सुरू केला. त्यांच्या अटकेसाठी रविवारी एटीएस पथक घाटकोपरमध्ये दाखल झाले. मुंबई एटीएसच्या मदतीने अझहरी यांना ताब्यात घेत रविवारी घाटकोपर पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्यांना अटक दाखवण्यात आले आहे.

former MLA Ulhas Pawar
अफवा पसरविण्यात रा. स्व. संघ वस्ताद; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
Border march canceled in Ladakh Determined to continue peaceful protests
लडाखमधील ‘सीमा मोर्चा’ रद्द; शांततापूर्ण निदर्शने सुरू ठेवण्याचा निर्धार
loksatta analysis 30 Indians promised high paying jobs in thailand duped into scams in laos
विश्लेषण: थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन… लाओसमध्ये बेकायदा रवानगी… ३० भारतीय तरुणांची कशी झाली सुटका?
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड

हेही वाचा – महावितरण ग्राहकांना ‘प्रीपेड’ची सक्ती? केंद्र सरकारच्या अर्थसहाय्यामुळे ग्राहकांना जाच

हेही वाचा – मुंबईतून अटक झालेले इस्लामी धर्मगुरु सलमान अजहरी कोण आहेत?

पोलीस कारवाईसाठी आल्याचे समजताच अझहरी समर्थकांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तसेच कारवाईला विरोध करत घोषणाबाजी केली. अझहरी यांनी त्यांना पोलिसांना सहकार्य करण्याची मागणी केली. सध्या त्यांचे शेकडो समर्थक पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या करून आहेत. पोलीस ठाण्याबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री दहा वाजले तरी समर्थक पोलीस ठाण्याबाहेरच थांबले. त्यांनी अटकेला विरोध केला, पोलिसांवर दगडफेक केली. सीसीटीव्हीच्या मदतीने रविवारी मध्यरात्री अखेर याप्रकरणी सलमान सय्यद, अजीज शेख, मोहम्मद शब्बीर, बिलाल रेहमान, मोहम्मद रजा कुरेशी यांच्यासह १६ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.