कांजूरमार्ग येथे वास्तव्यास असलेल्या ४५ वर्षीय डॉक्टरकडे अडीच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अंधेरीतील डी. एन. नगर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- Deven Bharti : “मुंबई पोलीस दलात कुणीही सिंघम नाही.. आम्ही सगळे..”

tax fraud case
१७५ कोटींचे कर फसणूक प्रकरण : विक्रीकर अधिकारी व १६ जणांवर गुन्हा दाखल, एसीबीची कारवाई
hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
Shahjahan Sheikh arrest
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेखला ५४ दिवसांनी अटक

तक्रारदार शशांक जोशी हे मेंदूर रोग तज्ज्ञ असून ते उपचार करीत असलेल्या रुग्णाचा २०१७ मध्ये मृत्यू झाला होता. याबाबत तक्रार दाखल होताच जे. जे. समितीने संपूर्ण प्रकरणाची तपासणी करून याप्रकरणी हलगर्जीपणा झाला नसल्याचा अहवाल दिला होता. पण त्यानंतरही मृत रुग्णाची पत्नी व इतर आरोपींनी धमकावल्याची तक्रार त्यांनी डी. एन. नगर पोलिसांकडे केली. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.