मुंबई : शिक्षिकेचे छायाचित्र काढून तिच्याबद्दल अश्लील टिप्पणी करणाऱ्या शाळेतील कर्माचाऱ्याविरोधात नागपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीला नोटीस देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.तक्रारदार ४४ वर्षीय महिला भायखळा येथील शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. ५५ वर्षीय आरोपी त्याच शाळेत काम करतो. आरोपी पीडित शिक्षिकेला २०१५ पासून त्रास देत होता.

महिला शिक्षिकेच्या परवानगीशिवाय त्याने तिचे छायाचित्र काढले होते. तसेच त्याने महिलेबाबत अश्लील व अपमानजनक टिप्पणीही केली. नेहमीच्या या त्रासाला कंटाळून अखेर शिक्षिकेने याप्रकरणी पोलिसाकडे तक्रार केली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात धमकावणे व अश्लील टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपीला सीआरपीसी कलम ४१ (१)(अ) अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे. आरोपी विरोधात नागपाडा व आग्रीपाडा पोलीस ठाण्यात धमकावणे व अश्लील टिप्पणी केल्याप्रकरणी यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत.

Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
ayesha jhulka, High Court, Pet Dogs Killing, Ayesha Jhulka Moves High Court, Seeking Expedited Justice, ayesha jhulka pet dog killed, ayesha jhulka dog killed case, mumbai high court, mumbai news,
हत्या झालेल्या श्वानाला न्याय मिळवून देण्यासाठी अभिनेत्री आयेशा जुल्का उच्च न्यायालयात
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!
pensioners association appeal not to vote in lok sabha elections
“वीज कर्मचाऱ्यांना पेंशन नकारणाऱ्या सरकारला लोकसभेत मतदान नाही,” कोणत्या संघटनेने केली घोषणा? वाचा…