लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः चौकशीसाठी थांबविल्याचा राग आल्यामुळे  गस्तीवर असलेल्या पोलिसाला बेदम मारहाण केल्याची घटना गोवंडी परिसरात गुरुवारी घडली. आरोपींनी पोलिसाला ठार मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार अफजल पिंजारी (४३) गुरूवारी गोवंडी बैगनवाडी परिसरात कार्यरत होते. यावेळी अमलीपदार्थ प्रतिबंधक गस्त सुरू होती. पिंजारी बैंगनवाडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी एका व्यक्तीला संशयावरून पोलिसांनी हटकले. पिंजारी यांनी त्याला ओळखपत्र दाखवून थांबण्यास सांगितले. यामुळे सदर व्यक्ती संतापली आणि तो पिंजारी यांच्या अंगावर धावून गेला. त्याने पिंजारी यांना शिवीगाळही केली. यावेळी झालेल्या गोंधळामुळे घटनास्थळी गर्दी जमली. गर्दीतील दोन व्यक्तीनी पिंजारी यांना लाथा-बुक्यांनी मारहाण केली. घटनेनंतर पिंजारी यांनी केलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे, धमकावणे अशा विविध कलमांतर्गत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यांत अल्लाउद्दीन मेहताब आलम कुरेशी ऊर्फ बिच्छुम, शहाबुद्दीन मेहताब आलम कुरेशी ऊर्फ गोगा व निजामुद्दीन मेहताब आलम कुरेशी ऊर्फ छोटू यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

The criminal was arrest by the police officer despite being injured nashik
जखमी होऊनही पोलीस अधिकाऱ्याकडून गुन्हेगार ताब्यात
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
police arrested man who chased and molested minor girl walking on road in Kalyan east on Tuesday
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या तरूणाला अटक
The Lok Adalat ordered Rs 4 crore compensation for bike riders family after collision
अपघातात मृत पावलेल्या दुचाकीस्वाराच्या कुटूंबियांना साडेचार कोटींची नुकसान भरपाई, मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचे आदेश
Lizard fell in curry, people in poisoned Bhandara,
धक्कादायक… भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात ५१ जणांना विषबाधा
seven women burnt by firecrackers during Ganpati immersion in umred
Video : फटाक्यामुळे ७ महिला भाजल्या, नागपुरातील उमरेडमध्ये गणपती विसर्जन मरवणुकीतील दुर्घटना
after nephew shocked while dancing group of people beat up uncle with stone
पुणे :नाचताना पुतण्याचा धक्का लागल्याचे निमित्त,टोळक्याकडून काकाला बेदम मारहाण
cop shoots wife dead in nanded district over minor dispute
पत्नीचा गोळी झाडून खून केल्यानंतर पोलीस कर्मचारी ठाण्यात हजर