मुंबईः पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. भारताने याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पाकिस्तानातील दहशवाद्यांच्या तळावर हल्ला केला. पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातील विविध भागांमध्ये नागरिकांनी पाकिस्तानाविरोधात विरोध दर्शवला. काहींनी पाकिस्तानाचे झेंडे जाळले, तर काहींनी पाकिस्तानी झेंडे रस्त्यावर लावत पायाने तुडवले.

विलेपार्ले स्थानकाच्या बाहेरील बाजूच्या पायऱ्यांनाही पाकिस्तानाचे झेंडे चिकटवण्यात आले होते. त्यात एक बुरखा घातलेली महिला पायऱ्यांवर लावलेले पाकिस्तानाचे झेंडे काढत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला होता. त्याप्रकरणी आता महिलेसह तिला मदत करणाऱ्या चार-पाच तरूणांविरोधात जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पाकिस्तानाचा निषेध म्हणून विलेपार्ले रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानाचे झेंडे लावण्यात आले होते. रेल्वे स्थानकावरुन रिक्षा स्थानकाकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर हे झेंडे लावण्यात आले होते. रिक्षाचालकांनीच झेंडे चिकटवले होते. तेथे अचानक बुरखा घालून एक मुस्लिम महिला आली. आरडाओरड करत पायऱ्यांवर लावलेले झेंडे काढू लागली. यावेळी अनेकांनी तिला विरोध करण्याचाही प्रयत्न केला. ही घटना ४ मे रोजी घडली.

विलेपार्ले रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी पाकिस्तानचे झेंडे चिकटवण्यात आले होते. यावर पाय द्या असे इंग्रजीमध्ये लिहिण्यात आले होते. त्यावेळी बुरखाधारी महिला तेथे आली व तिने निषेध करणाऱ्या लोकांशी वाद घातला. तसेच तेथे चिकटवलेले पाकिस्तानी झेंड्याचे स्टीकर काढण्यास सुरूवात केली. यावेळी चार ते पाच तरूण त्यांना मदत करत होते. त्यांच्याविरोधात बेकायदा जमाव जमवणे, शांतता भंग करणे अशा विविथ कलमांतर्गत जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी स्वतः तक्रार केलीभारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १९० व ३५२ अंतर्गत आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ध्वनीचित्रफीत प्रसारित झाल्यानंतर समाज माध्यमांवर मोठ्याप्रमाणात याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी स्वतः याप्रकरणी तक्रार केली आहे. जुहू पोलीस ठाण्याचे मील्स स्पेशल विभागात कार्यरत पोलीस संतोष साळुंखे यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते परिसरात गोपनीय माहिती गोळा करत असताना त्यांनी संबंधीत व्हिडिओ समाज माध्यमांवर पाहिला त्यावरून त्यांनी तक्रार केली आहे. याप्रकरणाचे पडसाद समाज माध्यमांवर मोठ्याप्रमाणात उमटत होते. याप्रकरणी महिलेसह तिला मदत करणाऱ्या तरूणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत होती.