scorecardresearch

Premium

साकीनाका परिसरात अग्नितांडव; अग्निशमन जवानांनी वाचवले ३३ जणांचे प्राण

अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले.

five-storey building Sakinaka ​​Andheri East fire Firefighters safely evacuated 33 residents building mumbai
साकीनाका परिसरात अग्नितांडव; अग्निशमन जवानांनी वाचवले ३३ जणांचे प्राण (छायाचित्र-PTI)

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: अंधेरी पूर्व येथील साकीनाका परिसरातील एका पाच मजली इमारतीला शनिवारी भीषण आग लागली. इमारतीमधील वीज मीटरला लागलेल्या आगीचा भडका उडाला आणि परिसरात घबराटीचे वातावरण पसरले. या इमारतीमध्ये एकूण ३३ रहिवासी अडकले होते. अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी ३३ रहिवाशांना सुखरुपपणे इमारतीतून बाहेर काढले.

Two kilos of ganja seized in Kondhwa area one arrested
कोंढवा परिसरात दोन किलो गांजा जप्त; गांजा विक्री प्रकरणात सराईत अटकेत
मुंबई : रस्ते फर्निचर कामासाठी नव्याने निविदा प्रक्रिया?लोकायुक्तांकडे सुनावणी सुरू असताना २११ कोटींचा नवा प्रस्ताव
Gutkha smuggling Nagpur
नागपूर : राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने उपराजधानीत गुटखा-तंबाखू तस्करी, वाडीत ५५ लाखांचा गुटखा जप्त
Chinese firecrackers worth 11 crore seized from Nhava Sheva port
न्हावा शेवा बंदरातून ११ कोटींचे चायनीज फटाके जप्त, ४० फुटांच्या कंटेनरमधून तस्करी

साकीनाका परिसरातील ९० फूट रस्त्यावरील डिसोझा कम्पाऊंडमधील साकी हाऊसिंग सोसायटीतील वीज मीटरला शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास आग लागली. क्षणार्धात आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले. ही आग तळमजला आणि पहिल्या मजल्यावर पसरल्याने इमारतीत रहिवासी अडकले होते. आगीमुळे इमारतीमध्ये धुराचे साम्राज्य पसरले होते. धुरामुळे रहिवाशांना जिन्यावरून खाली येणे शक्य होत नव्हते.

हेही वाचा… फरार आरोपीला आठ वर्षांनंतर अटक

घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करीत त्यांनी शनिवारी सकाळी १०.४६ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ३३ रहिवाशांना दुर्घटनाग्रस्त इमारतीतून सुरक्षित बाहेर काढले. सुदैवाने या दुर्घटनेत काेणीही जखमी झाले नाही, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A five storey building in sakinaka andheri east caught fire firefighters safely evacuated 33 residents from the building mumbai print news dvr

First published on: 09-09-2023 at 17:17 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×