मुंबई : पश्चिम आशियातील पहिल्यावहिल्या आणि जून-जुलैऐवजी नोव्हेंबर-डिसेंबरसारख्या ‘अवकाळी’ हंगामात खेळवल्या जात असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल महासोहळय़ाला रविवारी कतारमध्ये प्रारंभ होत आहे.

एकीकडे वातानुकूलित मैदाने कतारच्या ऐश्वर्याचे पुरावे मांडत असताना, दुसरीकडे बियरवरील बंदी आणि एलजीबीटी समुदायाविषयीच्या बंदिस्त कायद्यांची सक्तीची अंमलबजावणी कतारच्या सामाजिक निकषांवरील मागासलेपणाचे दाखलेही सादर करतात. या सर्व पार्श्वभूमीवर फुटबॉल मैदानावर हुन्नर दाखवून जगातील सर्वात महत्त्वाचा क्रीडा करंडक जिंकण्याचे आव्हान सहभागी संघांसमोर आहे. लिओनेल मेसी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, केव्हिन डेब्रुइने, कायलेन एम्बापे, रॉबर्ट लेवांडोवस्की, नेयमार, हॅरी केन असे एकाहून एक सरस फुटबॉलपटू क्लब पातळीवर खेळताना आपण पाहिले. पण यांतील प्रत्येकाला आपल्या संघासाठी विश्वचषक जिंकून देण्याची इच्छाही तितकीच असते का, हे यानिमित्ताने दिसून येईल. गेल्या दशकभरातील सर्वोत्तम फुटबॉलपटू मेसी आणि रोनाल्डो यांनी आपापल्या राष्ट्रीय संघांसाठी अनुक्रमे कोपा अमेरिका व युरो चषक जिंकून दिलेला आहे. परंतु जगज्जेतेपदाचा साज चढवल्याशिवाय आपल्या कारकीर्दीला झळाळी येणार नाही, हे दोघेही जाणून आहेत.

candidates chess gukesh beat abasov
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश पुन्हा संयुक्त आघाडीवर; प्रज्ञानंदने नेपोम्नियाशीला बरोबरीत रोखले; कारुआनाकडून विदितचा पराभव
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
Glenn Maxwell makes bizarre comment on Virat Kohli
T20 World Cup : ‘मला आशा आहे की विराट कोहलीची निवड होणार नाही’, आरसीबीच्या ‘या’ खेळाडूचे चकित करणारे वक्तव्य
IPL 2024 Performance of 5 impact players
IPL 2024 : शिवम दुबे ते साई सुदर्शनपर्यंत ‘या’ ५ ‘इम्पॅक्ट प्लेयर्स’नी पहिल्या १० दिवसात गाजवलं मैदान

युरोपिय हंगामाच्या ऐन मध्यावर ही स्पर्धा खेळवली जात असल्यामुळे बडय़ा क्लबांची नाराजी संयोजक आणि फिफाने ओढवून घेतली आहे. याशिवाय अनेक बडे खेळाडू दुखापतग्रस्त असल्यामुळे स्पर्धेत दिसणार नाहीत. एन्गोलो कान्टे, पॉल पोग्बा, सादिओ माने, टिनो वेर्नर अशी ही यादी मोठी आहे.
विश्वचषकाच्या इतिहासातली ही २२वी स्पर्धा. पण आजवर ब्राझील, इटली, जर्मनी, फ्रान्स, अर्जेटिना, उरुग्वे, स्पेन, इंग्लंड अशा आठच देशांना ती जिंकता आली. यंदा नेदरलँड्ससारखा एखादा नवीन विश्वविजेता लाभतो, की अर्जेटिना, ब्राझील, फ्रान्सकडेच पुन्हा जगज्जेतेपद येते, हे पुढील २८ दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

संबंधित / क्रीडा