मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लक्झरी बस उलटून अपघात, दोन महिला ठार

बस पुण्याहून मुंबईकडे जात असताना पहिल्या लेनमध्ये हा अपघात झाला, त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर माडप बोगद्यात बस उलटली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील माडप बोगद्यामध्ये एक खासगी लक्झरी बस उलटल्याचे वृत्त आहे. या भीषण अपघातात दोन महिला ठार तर इतर ७ जण जखमी झाले आहेत. बस पुण्याहून मुंबईकडे जात असताना पहिल्या लेनमध्ये हा अपघात झाला. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. जखमीनां कामोठे येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, पुण्याहून मुबंईकडे जाणाऱ्या एक लक्झरी बस पहिल्या लेनमधील माडप बोगद्यामध्ये उलटली. बोगद्यामध्येच हा अपघात झाल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे एक्स्प्रेस वे वर मोठी वाहतूक कोंडीही झाली आहे. या अपघातात दोन महिला ठार झाल्या आहेत. तर इतर ७ जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, बचाव कार्यासाठी यंत्रणा कामाला लागली असून या महामार्गाच्या देखभालीचे काम असलेल्या आयआरबी कंपनीची टीम, महामार्ग पोलीस, खालापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: A luxury bus overturned in the madp tunnel at mumbai pune expressway two women killed

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या