मुंबई : मुलुंड (पश्चिम) येथील महाराणा प्रताप जंक्शन येथे पादचाऱ्यांसाठी आकाश मार्गिका (स्काय वॉक) उभारण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. बेस्ट बस आगार आणि प्रस्तावित मेट्रो स्थानकाला जोडण्यात येणाऱ्या या आकाश मार्गिकेमुळे वाहतुकीची कोंडी कमी होण्यास, तसेच पादचाऱ्यांचा प्रवास सुकर होण्यास मदत होणार आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते आणि पुलांची बांधणी करण्याबरोबरच आकाश मार्गिकांची उभारणी करण्याचे नियोजन महानगरपालिकेने केले आहे. याबाबत माहिती देताना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू म्हणाले की, मुलुंड पश्चिम येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. या ठिकाणी पाच रस्ते एकमेकांना मिळतात. सततच्या वाहनांच्या रहदारीमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे जिकिरीचे होते. या ठिकाणी बेस्ट आगारही आहे. त्यामुळे पादचाऱ्यांची वर्दळ कायम असते. या पार्श्वभूमीवर, वाहतूक प्रगणकांनी नुकतीच या रस्त्यावरील पादचारी संख्या आणि रहदारी प्रमाणाचे सर्वेक्षण केले. तसेच सल्लागार संस्थेने व्यवहार्यता अहवालही तयार केला.

pune ring road,
पुणे : रिंगरोडमध्ये परदेशी कंपन्यांना रस
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही
Mumbai to Pune share cab fares
मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी शेअर कॅबच्या भाड्यात वाढ होणार

हेही वाचा >>>शरद पवारांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

विविध उपाययोजना आणि पर्यायांचा विचार करता महाराणा प्रताप जंक्शन येथे पादचाऱ्यांसाठी आकाश मार्गिका उभारण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. या आकाश मार्गिकेमुळे नियमितपणे ये – जा करणाऱ्या पादचाऱ्यांना मदत होणार आहे. तसेच, प्रस्तावित मेट्रो स्थानकाला आकाश मार्गिका जोडण्यात येणार असल्याने रस्त्यावरील पादचाऱ्यांची गर्दी कमी होण्यास मदत होईल, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>>जीवे मारण्याची धमकी आल्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाले…

या आकाश मार्गिकेची एकूण लांबी ४५१.१६ मीटर आणि रुंदी ३ मीटर असेल. आकाश मार्गिकेचे बांधकाम पाइल फाउंडेशन पद्धतीने करण्यात येणार आहे. १२५ मिलीमीटर जाडीच्या काँक्रिट डेक स्लॅबसह स्टील कंपोझिट प्लेट गर्डर्सचा बांधकामात समावेश असेल. अत्याधुनिक सरकते जिने आणि पायऱ्यांमध्ये अँटी-स्किप टाइल्स स्लॅब प्रस्तावित आहेत. छतासाठी पॉलीप्रोपीलीन पत्रे वापरण्यात येणार आहेत. पायाचे बांधकाम पाईल फाऊंडेशन करण्यात येणार असून स्ट्रक्चरल स्टील व आर. सी. सी. पाइलने बांधकाम केले जाणार आहे. पुलाचे पृष्ठीकरण काँक्रिट स्लॅबने केले जाणार आहे, अशी माहिती पूल विभागाचे प्रमुख अभियंता संजय कौंडण्यपुरे यांनी दिली.