अवयवदानात अल्पशी वाढ; दहा महिन्यांत ३० दात्यांकडून ८६ अवयवांचे दान

२०२१ मध्येही सुरुवातीचे काही महिने दुसरी लाट वेगाने पसरत असल्यामुळे अवयवदान फारसे होऊ शकले नाही.

दहा महिन्यांत ३० दात्यांकडून ८६ अवयवांचे दान

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे मरणोत्तर अवयवदान आणि प्रत्यारोपणाचे प्रमाणही मुंबईत हळूहळू वाढू लागले आहे. गेल्यावर्षी करोनाचा फटका बसल्यामुळे वर्षभरात केवळ ३० दात्यांनी अवयवदान केले होते, परंतु यावर्षी मुंबईने ऑक्टोबरमध्येच हा टप्पा पार केला आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेनंतर सर्व आरोग्य व्यवस्था करोनाकेंद्री झाल्यामुळे इतर आरोग्य सेवेवर याचा परिणाम झाला. मरणोत्तर अवयवदान आणि प्रत्यारोपणावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. मुंबईत २०१९ मध्ये ७९ दात्यांकडून अवयवदान करण्यात आले. गेल्या दोन दशकातील हे सर्वाधिक अवयवदान होते. परंतु २०२० मध्ये करोनाची साथ आल्यानंतर सर्व अतिरिक्त शस्त्रक्रिया पुढे ढकलल्यामुळे आणि रुग्णांमध्येही करोनाबाधित होण्याची भीती असल्यामुळे अवयवदान आणि प्रत्यारोपणाची संख्या ३० पर्यंत घटली.

२०२१ मध्येही सुरुवातीचे काही महिने दुसरी लाट वेगाने पसरत असल्यामुळे अवयवदान फारसे होऊ शकले नाही. परंतु दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाल्यानंतर अवयवदान आणि प्रत्यारोपणाने पुन्हा वेग घेतला. त्यामुळेच गेल्या दहा महिन्यांमध्ये ३० दात्यांचे अवयवदान    होऊ शकले.

देशभरात अवयवदानामध्ये तेलंगणापाठोपाठ महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. त्यामुळे यावर्षी मुंबई आणि राज्याने करोनाकाळातही अवयवदान आणि प्रत्यारोपण वाढविण्यावर अधिक भर दिल्यामुळेच हे शक्य झाले आहे. गेल्या वर्षापासून आतापर्यंत मुंबईत जवळपास १९० अवयवांचे प्रत्यारोपण केले गेले, तरी एकाही रुग्णाला किंवा आरोग्य कर्मचाऱ्याला करोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. ही प्रक्रिया करताना काळजी घेतली जात असल्यामुळेच आता रुग्णही प्रत्यारोपण करून घेण्यास हळूहळू पुढे येत आहेत. येत्या काळात हे प्रमाण आणखी वाढेल, असा विश्वास विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ. एस. के. माथुर यांनी व्यक्त केला.

९५ अवयवांचे प्रत्यारोपण

मुंबईत १८ ऑक्टोबरपर्यंत ९५ अवयवांचे प्रत्यारोपण केले असून यातील काही अवयव अन्य विभागातून मुंबईला मिळालेले आहेत. यात ४१ मूत्र्रंपड, २७ यकृत, एक मूत्र्रंपड आणि यकृत, दोन मूत्र्रंपड आणि स्वार्दुंपड, १४ हृदय, तीन फुप्फुसांचे प्रत्यारोपण करून रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. तसेच यात एका रुग्णावर दोन्ही तर एका रुग्णावर एका हाताचेही प्रत्यारोपण केले आहे.

अवयवदानातून  ८६ अवयव प्राप्त

१८ ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार, मुंबईत ३० दात्यांनी मरणोत्तर अवयवदान केल्यामुळे प्रत्यारोपणासाठी ८६ अवयव प्राप्त झाले आहेत. यात ४४ मूत्र्रंपड, २८ यकृत, सात हृदय, चार फुप्फूस, दोन स्वार्दुंपड आणि दोन हात यांचा समावेश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: A slight increase in organ donation donation of 86 organs akp

ताज्या बातम्या