मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज दुपारच्या सुमारास एकच खळबळ उडली जेव्हा एका न्यायाधिशांच्या चेंबरमध्ये मोठ्या आकाराचा साप आढळून आला. चेंबरमध्ये साप असल्याची बातमी न्यायालयाच्या आवारात वाऱ्यासारखी पसरली. सर्पमित्रांच्या मदतीने या सापाची सुटका करण्यात आलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समोर आलेल्या माहितीनुसार सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास न्यायमूर्ती बोरकर यांच्या चेंबरमध्ये साप आढळून आला. हा साप आढळून आल्यानंतर आधी एकच गोंधळ उडाला.

नंतर या ठिकाणी सापाला शोधण्यासाठी सर्पमित्रांना पाचरण करण्यात आलं. त्यांनी अगदी काही मिनिटांमध्येच चेंबरमधील हा साप पकडला आणि गोणीमध्ये भरुन तो चेंबरबाहेर आणला.

हा साप पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी चेंबरच्याबाहेरही बघ्यांची मोठी गर्दी झाल्याचं पहायला मिळालं. हा साप नक्की कुठून आणि कसा अगदी न्यायाधिशांच्या चेंबरपर्यंत आला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A snake found in the bombay high court judges chamber scsg
First published on: 21-01-2022 at 14:09 IST