मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरेंची माध्यमांना प्रतिक्रिया, म्हणाले…

शिवसेना नेते संजय राऊत यांची देखील होती उपस्थिती

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तीन दिवसीय दौऱ्यासाठी आज मुंबईत दाखल झालेल्या आहेत. या दौऱ्यात त्या अनेक महत्वपूर्ण भेटीगाठी घेणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील त्या उद्या भेटणार आहेत. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील त्या भेटणार होत्या, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांची भेट होणार नाही. म्हणून आज राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. या भेटीनंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना भेटीबाबत माहिती दिली.

आदित्य ठाकरे म्हणाले, “आज त्या(ममता बॅनर्जी) मुंबईत आलेल्या आहेत, या अगोदर दोन-तीन वर्षांपूर्वी देखील जेव्हा त्या आल्या होत्या, तेव्हा स्वतः उद्धव ठाकरे व मी त्यांना भेटण्यासाठी आलो होतो. आता मी संजय राऊत यांच्यासोबत आलेलो आहे. अर्थातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री ममतादीदी यांच्यात एक वेगळं नातं आहे. नेहमीच दोघांमध्ये समन्वय राहिलेला आहे. आता कोविडच्या काळात असेल किंवा राजकारणात असेल. स्वाभाविक होतं की त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती, मात्र बायोबबलमध्ये त्या भेटू शकल्या नाहीत. तर मी त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहे. मला स्वतःहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटण्यासाठी पाठवलं. मी शुभेच्छा देखील दिल्या आणि त्यांनी एक शुभ संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी दिलेला आहे. ”

तसेच, “मागील वेळी ममता बॅनर्जी जेव्हा मुंबईत आल्या होत्या, तेव्हा देखील त्यांची भेट घेतली होती. एक मैत्रीचं जे नातं आहे, ते वेगळं आहे. तेच वाढवण्यासाठी त्या जेव्हा मुंबईत येता तेव्हा त्यांचं स्वागत करणं स्वाभाविक आहे. आज आम्ही केवळ त्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो, अनेक विषयांवर चर्चा झाली. परंतु त्या मुंबईत आलेल्या आहेत तर आम्ही त्याचं इथे येऊन स्वागत केलं.”असंही आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

सिद्धिविनायकाच्या दर्शनाने ममता बॅनर्जींनी केला मुंबई दौऱ्याचा ‘श्री गणेशा’!

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या आहेत. त्यांनी आज आपल्या दौऱ्याची सुरूवात करण्या अगोदर श्री सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांना देखील प्रतिक्रिया दिली.

ममता बॅनर्जी – उद्धव ठाकरे यांची भेट होणार नाही

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. ममता बॅनर्जींचा हा राजकीय चर्चांचा विषय देखील ठरत आहे. कारण, दिल्लीत नुकतीच पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर आता, या मुंबई दौऱ्यात ममता बॅनर्जी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत आहेत. शिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचे देखील त्यांचे नियोजन होते, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांची भेट होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aaditya thackeray and sanjay raut met west bengal cm and tmc chief mamata banerjee msr

Next Story
ममता बॅनर्जी – उद्धव ठाकरे यांची भेट होणार नाही ; आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबरोबर होणार चर्चा!
फोटो गॅलरी