शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या वरळी विधानसभा मतदारसंघातील मतदारांना एक पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी केलेल्या विकास कामांवर बोलताना विरोधकांच्या बॅनरबाजीचा समाचार घेतला. तसेच यापूर्वी जूनमध्ये गलिच्छा राजकारण आणि गद्दारी करून लोक हिताचा विचार करणारे सरकार पाडलं गेलं, असा आरोपही आदित्य ठाकरेंनी या पत्रात केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्राच्या विधानसभेत वरळीचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी निवड होऊन तीन वर्षे झाली आहेत. या तीन वर्षात आपल्या प्रेमाने मला आशीर्वादित केले आहेत. मी प्रार्थना करतो की हेच प्रेम आणि तुमचे आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहोत. माझ्या निवडणुकीपूर्वी मी तुम्हाला वरळी ए प्लस (A+) करण्याचे वचन दिले होते. गेल्या तीन वर्षात वरळीला प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी आपण सर्व एकसंघ म्हणून काम करत आहोत.”

Raju Shettys candidature filed by going in bullock cart show of strength by swabhimani shetkari sanghatana
बैलगाडीने जात राजू शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज दाखल, ‘स्वाभिमानी’चे जोरदार शक्तीप्रदर्शन
Loksatta Chavdi Happening In Maharashtra Politics News On Maharashtra Political Crisis
चावडी: ओ शेट.. भाषणबाजीच ग्रेट
Shrikant Shinde appeal
कल्याण लोकसभेत व्यक्तिगत कारणांसाठी महायुतीचे वातावरण खराब करू नका, आमदार गायकवाड समर्थकांना खासदार शिंदेंचे आवाहन
Sunita Kejriwal
अरविंद केजरीवालांचा तुरुंगातून संदेश; पत्नी सुनीता म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांनी आप आमदारांना आपापल्या मतदारसंघात…”

“वरळीत नवीन बस थांबे, चांगले फुटपाथ, मजबूत रस्ते”

“नवीन बस थांबे असोत, चांगले फुटपाथ, मजबूत रस्ते असोत, हिरवीगार मोकळ्या जागा असो किंवा सामुदायिक स्तरावर आणि वैयक्तिक स्तरावर लसीकरण ड्राईव्ह आणि इतर समस्येचे निराकरण असो, आपण वरळीकरांच्या सहकार्याने करत आलो आहोत,” असं आदित्य ठाकरेंनी आपल्या पत्रात सांगितलं.

“वरळीत बेकायदेशीर बॅनर”

आदित्य ठाकरे या पत्रात पुढे म्हणाले, “म्हणूनच राजकीयदृष्ट्या प्रत्येक पक्षालादेखील वरळीत वेळ आणि पैसा खर्च करायचा असतो. आपल्या वरळीवर त्यांचे लक्ष, त्यांनी वरळीत लावलेले बेकायदेशीर बॅनर आणि त्यावर होणारा खर्च यामुळे मला खात्री पटते की वरळी हेवा वाटावा अशी प्रगती करते आहे. त्यामुळेच त्यांनाही वरळीत यावंसं वाटतं आहे.”

हेही वाचा : “एकदा मी अब्दुल सत्तारांना माईकने मारणार होतो, पण…”; हिरवा साप म्हणत चंद्रकांत खैरेंची सडकून टीका

“जूनमध्ये गलिच्छ राजकारण आणि गद्दारी”

“यापूर्वी जूनमध्ये गलिच्छ राजकारण आणि गद्दारी करून लोकहिताचा विचार करणारं सरकार पाडलं गेलं. पण आम्हाला नि:स्वार्थपणे काम करण्यापासून आणि आपली सेवा करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाहीत. आम्ही तुमचा आशीर्वाद आणि प्रेमासाठी काम करतच राहू आणि हेच आम्हाला पुढे ऊर्जा देत राहिल,” असंही आदित्य ठाकरेंनी नमूद केलं.