scorecardresearch

Premium

“बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा मारल्यानंतर आता रिअ‍ॅक्शन येणार”, ठाकरे गटाच्या मोर्चाआधी आदित्य ठाकरेंचा इशारा

मुंबई महापालिकेतल्या भ्रष्ट्राचाराला वाचा फोडण्यासाठी १ जुलै रोजी शिवसेना महापालिकेवर विराट मोर्चा काढणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

Aditya Thackeray
आदित्य ठाकरे (PC : Aditya Thackeray Twitter)

मुंबई महापालिका विसर्जित होऊन एक वर्ष झालं तरी अद्याप निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. यावरून शिवसेनेचा ठाकरे गट १ जुलै रोजी मोर्चा काढणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याची हिंमत बेकायदेशीर सरकारमध्ये नाही. पैसा उधळला जातोय, त्याचबरोबर त्यांना जाब विचारणारं कुणी नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत (२० जुलै रोजी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) आता महापालिकेवर १ जुलै रोजी विराट मोर्चा काढणार आहे, अशीही घोषणा उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात केली होती.

या मोर्चाची ठाकरे गटाकडून तयारी सुरू आहे. आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला जाणार आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबई महापलिकेत जो भ्रष्ट्राचार सुरू आहे त्याविरोधात आमचा हा मोर्चा असेल. आपण एक वर्ष झालं पाहत आहोत. मुंबईतला रस्ते घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा, खडीचा घोटाळा, वेंडिग मशीनचा घोटाळा यावर बोलण्यासाठी, हे सगळे प्रश्न मुंबईकरांसमोर आणण्यासाठी हा मोर्चा काढला जाईल.

Sharad Pawar pimpri chinchwad
पक्षातील फुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच अजितदादांच्या बालेकिल्यात; कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत
Vijay Wadettiwar criticized Eknath Shinde
वडेट्टीवार स्पष्टच म्हणाले, २१ लोक ईडीच्या रडारवर होते, ते सत्तेत गेल्याने…
son of former minister harassed woman, former minister balasaheb shivrkar
महिलेला धमकावून विनयभंग; माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या मुलाविरूद्ध गुन्हा
rahul narvekar supreme court uddhav thackeray eknath shinde
बंडखोरांच्या अपात्रतेबाबतच्या घडामोडींना वेग, दिल्लीतील भेटीगाठीवर राहुल नार्वेकर म्हणाले…

आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबई महापालिकेतल्या भ्रष्ट्राचाराला वाचा फोडण्यासाठी, तिथे सुरू असलेल्या घोटाळ्यांबद्दल जाब विचारण्यासाठी येत्या १ जुलै रोजी शिवसेना महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे.

हे ही वाचा >> मुंबई महापालिका कार्यालयात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा राडा, अधिकाऱ्यांना मारहाण, पोलीस कारवाईच्या तयारीत

आदित्य ठाकरे म्हणाले, अनधिकृत म्हणून जी शाखा महापालिकेने तोडली त्या शाखेत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता. त्या शाखेवर गद्दारांनी बुलडोझर चढवला. राज्यात कुठेही शिवाजी महाराजांचा फोटोवर अथवा बाळासाहेबांच्या फोटोवर कोणी हातोडा चालवला तर त्यांच्या चाहत्यांकडून रिअ‍ॅक्शन येऊ शकते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aaditya thackeray says will get strong reaction from bal thackeray fans after hammering on photo asc

First published on: 26-06-2023 at 19:08 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×