राज्य सरकारने  प्रशासनात मोठ्याप्रमाणात फेरबदल करताना २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. कोल्हापूर, हिंगोली, अकोला, परभणी, जालना आदी जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, परभणीच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या आयएएस आधिकारी आंचल गोयल यांना रुजू होण्यापुर्वीचं माघारी परतावे लागले. त्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यासाठी शिवसेना खासदाराने थेट मंत्रायात लॉबिंग केल्याची देखील चर्चा होती. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आंचल गोयलचं परभणीच्या जिल्हाधिकारी राहणार असल्याची माहिती पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

नवाब मलिक म्हणाले, “याबाबत आधिच २१ मार्चला आदेश निर्गमित झाले होते. परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून चार्ज घेण्याबाबत आंचल गोयल माझ्याशी बोलल्या होत्या. त्यांच्या बदलीबाबत काही लोकप्रतिनिधींचा आक्षेप होता. त्यांची बदली करण्यात आली नव्हती. तुम्ही तात्पुरतं थांबा असं त्यांना कळविण्यात आलं होतं. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून आंचल गोयल यांना पदभार सोपवला पाहीजे यावर चर्चा झाली, यावर मुख्यमंत्र्यांनी होकार दिला. आंचल गोयल यांना हा निर्णय कळविण्यात येईल त्यानंतर त्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी स्विकारतील.”

हेही वाचा- राज्य सरकारचा मोठा निर्णय; पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजला मंजुरी!

आंचल गोयल यांना कोणत्या नेत्याचा विरोध होता याबाबत नवाब मलिक यांनी माहिती दिली नाही. मात्र माझा या प्रकरणात हस्तक्षेप नसल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली.