आम आदमी पार्टी अर्थात आप हा पक्ष आता मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार आहे. मुंबई महापालिका निवडणूक लढताना आप हा पक्ष कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही. खासदार संजय सिंह यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दिल्ली विधानसभेत सलग दुसऱ्यांदा भाजपाचा पराभव केल्यानंतर आपचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यांनी त्याचवेळी देशभरात भाजपासमोर आव्हान उभं करणार असं म्हटलं होतं. त्यानुसार आपची पावलं पडत आहेत असं दिसतं आहे. कारण आता महापालिका निवडणुकीतही आपने आव्हान उभं करायचं ठरवलं आहे.