मुंबई : पश्चिम उपनगरातील गोरेगाव आरे मेट्रो स्थानकाखाली एका खाजगी बसला शुक्रवारी संध्याकाळी ६.१५ च्या सुमारास अचानक आग लागली. महादेव ट्रॅव्हल्स कंपनीच्या स्लीपर कोच बसला आग लागली असून अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.

आरे कॉलनी मेट्रो स्थानकाखाली शुक्रवारी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास महादेव ट्रॅव्हल्स कंपनीच्या स्लीपर कोच बसला आग लागली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, मात्र या अपघातात बस पूर्णपणे जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. बसमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याचे लक्षात येतात चालकाने ही बस वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एका बाजूला उभी केली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. महादेव ट्रॅव्हल नावाची ही स्लिपर कोच बस आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून आग नेमकी कशी लागली, का लागली या सर्व बाबींचा पोलीस तपास करीत आहेत. बसला आग लागली त्यावेळी बसमध्ये पाच प्रवासी होते. ही बस गुजरातला जात होती.