स्त्रीच्या धैर्य आणि निर्धारातून जन्माला आलेली संघर्षगाथा मांडतानाच स्त्री सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित करणारी कथा ‘अभया’ या आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. ‘अभया’ हा माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील ग्रेडिएंटे इन्फोटेन्मेट लिमिटेड या डॉ. विमल राज माथुर यांच्या कंपनीची निर्मिती असलेला पहिला मराठी चित्रपट आहे.

या चित्रपटाची निर्मिती आरडीजी प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने केली जात असून दिग्दर्शन आणि लेखन युसुफ सुरती यांनी केले आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेत्री योगिता भोसले दिसणार आहे. तसेच, या चित्रपटात मोहन जोशी, कमलेश सावंत, गणेश यादव, रोहित कोकाटे आणि हर्षा निक्कम यांसारखे मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर कलाकार देखील झळकणार आहेत. “अभया ही अत्यंत भावनिक आणि प्रभावी कथा आहे. ती अशा एका स्त्रीची ताकद दाखवते जी आयुष्यातील आव्हानांना धैर्य आणि निर्धाराने सामोरे जाते. या चित्रपटाद्वारे आम्ही प्रेक्षकांना अर्थपूर्ण आणि प्रभावी सिनेमॅटिक अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहोत”, असे निर्माते डॉ. विमल राज माथुर यांनी सांगितले.

Award Banner