दहिसरचे शिवसेना उबाठाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाला त्यांच्या धाकट्या भावाने अग्नी दिला. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नोरोन्हा या स्वंयघोषित नेत्याने गुरुवारी अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या केली.

आज दिवसभर अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा विषय मुंबईत चर्चेत राहिला. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. तसंच घोसाळकर कुटुंबाचं सांत्वन केलं. ज्यावेळी अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणण्यात आलं तेव्हा त्यांचे वडील विनोद घोसाळकर आणि त्यांची पत्नी, मुलगी यांना सगळ्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी टाहो फोडला होता. त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे पण वाचा- “देवेंद्र फडणवीस जर माणसाच्या मृत्यूला श्वानाची किंमत देणार असतील तर..”, जितेंद्र आव्हाड यांची टीका

अभिषेक घोसाळकर यांचे वडील, पत्नी आणि मुलगी यांनी फोडला टाहो

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव आज बोरिवली येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही घोसाळकर कुटुंबाची भेट घेतली. ज्यावेळी अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव घराच्या खाली आणण्यात आलं तेव्हा त्यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी टाहो फोडला. तर अभिषेक घोसाळकर यांची पत्नी आणि मुलगी या दोघींच्या डोळ्यातले अश्रूही थांबत नव्हते.

नेमकी घटना काय घडली?

मुंबईतल्या दहिसर भागात उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा नाव्चाय स्वयंघोषित नेत्याने आणि सामाजिक कार्यकर्त्याने गुरुवारी रात्री त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर तातडीने अभिषेक घोसाळकर यांना करुणा रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अभिषेक घोसाळकर यांची हत्या केल्यानंतर मॉरिसने स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली.

हे पण वाचा- Abhishek Ghosalkar Shot Dead: शिवसेनेचा कार्यकर्ता ते तडफदार नगरसेवक, गोळीबारात मृत्यू झालेले अभिषेक घोसाळकर कोण होते?

उद्धव ठाकरेंनी केलं सांत्वन

उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक असलेल्या विनोद घोसाळकर यांच्या मुलाची आणि शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाची अशी धक्कादायक हत्या झाल्यानंतर, उद्धव ठाकरे हे सहकुटुंब घोसाळकरांच्या घरी पोहोचले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते. उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते हे घोसाळकरांच्या निवासस्थानच्या समोर असलेल्या एका हॉलमध्ये थांबले. उद्धव ठाकरेंनी पोलीस उपायुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा करुन, संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.

Story img Loader